उस्मानाबाद : सोयाबीनचा पीक विमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना

 उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे अनेक गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे  सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याखाली आहेत आणि  फार मोठे नुकसान झाले आहे.त्याकरिता विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्याकरिता शेतकऱ्यांनी  नुकसान झाल्याची तक्रार दाखल करणे गरजेचे आहे त्याकरिता PMFBY हे अँप आपल्या फोन मध्ये डाउनलोड करून त्याद्वारे तक्रार दाखल करायची आहे, तर त्याची पूर्ण प्रोसेस पुढील प्रमाणे आहे.


1) PLAY STORE मधून PMFBY हे अँप डाउनलोड करा.

2) अँप ओपन होताच CROP LOSS या नावाच्या TAB वरती क्लिक करा.

3) CROP LOSS INTIMATION अशी TAB निवडा.

4) आपला mobile नंबर दाखल करा,  आपनास एक OTP प्राप्त होईल तो तेथे दाखल करा.

5)OTP दाखल केल्यानंतर पुडील पेज OPEN होईल, A) हंगाम(SEAAON) - खरीप, B) वर्ष(YEAR) - 2020, C) योजना(SCHME) - PRADHAN MANTRI FASAL BIMA YOJANA, D) राज्य(STATE) - महाराष्ट्र, 

वरील माहिती भरून Select नावची TAB निवडा. पुढील पेज OPEN होईल.

त्यामध्ये आपला पॉलसी क्रमांक दिसेल तो सिलेक्ट करून पुडील पेज उघडा.

REPORT INCIDANCE नावाचे पेज ओपन होईल, त्यामध्ये

1) Type of Incidence मध्ये 

Excess Rainfall ( अतिवृष्टी ) हे ऑपशन निवडा,

2) Date of Incidence मध्ये नुकसान झालेली तातिख निवडा,

3) Status of crop at the time of Incidence ( पीक शेतामध्ये उभे आहे की कापणी केलेले आहे हे निवडा)

4) नुकसानीची अंदाजित टक्केवारी टका

5) Upload Photo या tab वरती क्लीक करताच आपल्या मोबाइल चा कॅमेरा चालू होईल पिकाचा फोटो काढा व शेवटी असलेल्या SUBMIT TAB वरती क्लीक करा तुमची तक्राक जमा होईल.

 एक तक्रार क्रमांक दिसेल त्याचा स्क्रीन शॉट काढून ठेवा ( काही वेळात तुम्हाला एक SMS द्वारे तक्रार घेतल्याची माहिती मिळेल)


( विमा कंपनी चा प्रतिनिधी आपल्या शेतात येऊन नुकसानीची पाहणी करेल )


अनेक शेतकऱ्यांना अँप डाऊनलोड कसे करावे, त्यात माहिती कशी भरावी याबाबत  अडचण येऊ शकते. आपण कुणावरही विश्वास न ठेवता आपल्या जवळच्या माणसाकडून फार्म भरावा. 


Post a Comment

0 Comments