शेतकऱ्यानी अंर्तगत अनुदानाचा लाभ घ्यावा


       उस्मानाबाद - कृषि यांत्रिकीकरण उप अभियान सन 2020-21 योजनेमध्‍ये कृषि यंत्रसामुग्री व उपकरणे खरेदीसाठी अर्थसहाय्य (अनुदानावर ट्रॅक्‍टर व कृषि औजारे पुरवठा )व भाडे तत्‍वावर कृषि यांत्रिकीकरण सेवेसाठी कृषि औजारे बँक स्‍थापनेसाठी दिनांक. 29 जुलै-2020 पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्‍याची कार्यवाही http://mahadbtmahait.gov.in  या संकेत स्‍थळावर सुरु झालेली आहे.  जिल्‍हयातील इच्‍छुक शेतक-यांनी http://mahadbtmahait.gov.in  या संकेत स्‍थळावर जाऊन  कृषि यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्‍यासाठी, इच्‍छुक शेतक-यांचे अर्ज सादर करण्‍याची कार्यपद्धती बाबतची माहिती पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुचना  या सदराखाली देण्‍यात आली आहे.   


         

         उस्‍मानाबाद जिल्‍हयातील इच्‍छुक शेतक-यांनी या योजनेचा लाभ घेण्‍यासाठी http://mahadbtmahait.gov.in  या संकेत स्‍थळावर स्‍वतः  किंवा सीएससी केंद्रामार्फत ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी ,कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन   जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी यु. आर घाटगे, यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

                                      

Post a Comment

0 Comments