उस्मानाबाद जिल्ह्यात तीन जुगार विरोधी कारवाई

येरमाळा: गौतम रामलींग लगाडे व अशोक बापु तोरड, दोघे रा. रत्नापुर, ता. कळंब हे दि. 25.09.2020 रोजी रत्नापुर फाटा येथील एका टपरीमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 3,420/-रु. बाळगले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले.


ढोकी: सरताज बशीर मशायक, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हा दि. 25.09.2020 रोजी गावातील बसस्थान येथील पानटपरीजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 1,050/-रु. बाळगला असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या पथकास आढळला.


 भुम: सागर रमेश टिपे व अमजद मेहबुब मोघल, दोघे रा. कसबा पेठ, भुम हे दि. 26.09.2020 रोजी भुम येथील फ्लोरा चौकात चक्री मटका जुगार चालवण्याचे साहित्य- जीओ कंपनीचे राऊटर- 2 नग, सीपीयु- 1, एल.जी. कंपनीचा संगनक व रोख रक्कम 2,760/-रु. असा एकुण 11,160/-रु. चा माल बाळगला असतांना उपविभागीय पोलीस अधिकारी, भुम यांच्या पथकास आढळले.

 यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.

Post a Comment

0 Comments