परंडा : टाकळीचे सुपुत्र वामन पवार चीन सीमेवर कर्तव्य बजावताना शहीद

 


परंडा - टाकळी ता परंडा येथील भारतीय सैन्यदलातील जवान वामन मोहन पवार हे भारत - चीन सीमेवर लद्दाक या ठिकाणी शाहिद झाले आहेत....
पवार हे भारत-चीन सीमेवर कार्यरत होते. येथे कर्तव्य बजावत असताना ते शहीद झाले असल्याची माहिती मंगळवारी (दि.२९) सकाळी ७ वाजता टाकळी येथील त्यांच्या घरी देण्यात आली. जवान वामन पवार यांचे पार्थिव गावी आणणार असून त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सैन्यात चालक पदावर १८ वर्ष कर्तव्य पूर्ण केल्यानंतर एक वर्ष मुदत वाढवून मिळाली होती. कुटुंबात आई, वडील, एक भाऊ, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. पवार हे लॉकडाऊनच्या पूर्वी दोन महिन्याच्या सुटीवर आले होते.
लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर त्यांना बोलावण्यात आल्याने ते गेले होते. अहमदाबाद येथे सैन्य दलाच्या निवासस्थानी पत्नी वैशाली, मुलगी (४) व मुलगा (३) राहात होते.

Post a Comment

0 Comments