कळंब तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला, आरोग्य यंत्रणा सुस्त


कळंब -  तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाच व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. मात्र याला चालवण्यासाठी फिजिशियन आद्यापही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे या विरोधात कळंब च्या नागरीकातून आक्रोश व्यक्त होत असुन लोकांचा जिव गेल्यावर व्हेंटिलेटर चालू करणार का असा संतप्त सवाल विचारला जात आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस शहरात वाढतच चालला आहे. शहरात सुरक्षित अंतर पाळणे, तोंडावर मास्क लावणे आदी गोष्टी पाळल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यासह शहरात सुध्दा कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसापुर्वी उपजिल्हा रुग्णालयात पीएम केअर फंडातून पाच व्हेंटिलेटर उपलब्ध झाले आहेत. व्हेंटिलेटर चालु नसल्यामुळे  कोरोना च्या गंभीर रुग्णांना उस्मानाबाद व इतर ठीकाणी पाठवण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडते आहे. व्हेंटिलेटर कार्यान्वित नसल्यामुळे मागील दिवसापुर्वी भाजपने व्हेंटिलेटर चे पुजन करुन अंदोलन करण्यात आले होते. मात्र आद्यापही प्रशासनाला जाग आलेली नाही. 


तालुक्यामध्ये एकुन ११५३ रुग्ण सापडले होते. यातील ९०४ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २४९ जणांवर उपचार चालू आहे. तर आत्तापर्यंत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. औद्यागिक प्रशिक्षण संस्था, रायगड मंगल कार्यालय व उपजिल्हा रुग्णालयात येथे कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. कोणी गंभीर रुग्ण असेल तर त्याला उस्मानाबाद येथे पाठविण्यात येत आहे. 


मागील काही दिवसांपासून उपजिल्हा रुग्णालय येथे व्हेंटिलेटर ची अॉक्सिजन लाईन तयार करण्यात आली आहे. मात्र आद्यापही व्हेंटिलेटर इन्स्टॉल करण्यात आलेले नाहीत. 


व्हेंटिलेटर पाच उपलब्ध झालेले असुन त्यांचे इन्स्टॉलेशन चे काम झालेले नाही. तसेच हे व्हेंटिलेटर चालवण्यासाठी फिजिशियन उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी वरिष्ठाकडे करण्यात आली आहे. तर भुलतज्ञ आज रोजी उपजिल्हा रुग्णालयात आलेले आहेत.

- डॉ. जिवन वायदंडे  (वैद्यकीय अधिक्षक, कळंब)

Post a Comment

0 Comments