येरमाळा पोलीसांच्या सतर्कतेने कर्नाटक राज्यातील अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका


 येरमाळा:  .  गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून  येरमाळा येथे आणण्यात आले होते. येरमाळा पोलीसांच्या सतर्कतेने कर्नाटक या  अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका झाली आहे. 

येरमाळा गावात एक कानडी तरुण एका बुरखाधारी अल्पवयीन मुलीस घेउन संशयास्पद राहत असल्याची गोपनीय खबर येरमाळा पोलीसांना मिळाली होती. यावर पोलीसांनी त्या तरुणास ताब्यात घेउन चौकशी केली असता तो तरुण- परवेज माजीद अन्सारी, वय 22 वर्षे, रा. आळंद, जि. गुलबर्गा, राज्य- कर्नाटक येथील असुन त्याच्या सोबत असणाऱ्या बुरखाधारी अल्पवयीन मुलीस त्याने राहत्या गावातून फूस लाउन पळवून आणले असल्याचे समजले.

 याबाबतीत गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 156 / 2020 हा  भा.दं.सं. कलम- 363 नुसार दाखल असल्याचे समजले.सदर हकीकत गुलबर्गा पोलीसांना कळवल्यानंतर आज दि. 27.09.2020 रोजी आळंद पो.ठा. चे पथक येरमाळा येथे आले असता त्यांच्या ताब्यात त्या तरुणास व अल्पवयीन मुलीस सुपूर्द करण्यात आले. अशा प्रकारे येरमाळा पोलीसांच्या सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा उलगडा झाला.


अपहरण


 नळदुर्ग: नळदुर्ग शहरात राहणारी एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 22.09.2020 रोजी 13.30 वा.  टेलरकडे कपडे आणन्यास जाते. असे आई- वडीलांस सांगुन घराबाहेर पडली. परंतु ती घरी परतली नसल्याने कुटूंबीयांनी नातेवाईक- परिचीतांकडे तीचा शोध घेतला असता काही उपयुक्त माहिती मिळाली नाही. यावरुन कोणीतरी व्यक्तीने तीचे अपहरण केले असावे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा दि. 26.09.2020 रोजी नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments