बेंबळी : अवैध मद्य विरोधी कारवाई


बेंबळी: परमेश्वर गोविंद वाघमारे, रा. चिखली, ता. कळंब हा दि. 25.09.2020 रोजी चिखली चौरस्ता येथील ‘सुभेदार हॉटेल’ मध्ये बियरच्या 14 बाटल्या (किं.अं. 2,380/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. बेंबळी यांच्या पथकास आढळला.


 शिराढोन: इक्बाल अकबर पठाण, रा. शिराढोन, ता. कळंब हा दि. 25.09.2020 रोजी आवारशिरपुरा पाटीजवळ ‘जय महाराष्ट्र हॉटेल’ शेजारी देशी- विदेशी दारुच्या 7 बाटल्या (किं.अं. 840/-रु.) विनापरवाना बाळगलेला तर धनराज माणिकराव पाटील रा. शिराढोन हा आज दि. 26.09.2020 रोजी गावातील एकुरका रस्त्यालगत असलेल्या तुळजाभवानी हॉटेल समोर देशी- विदेशी दारुच्या 12 बाटल्या (किं.अं. 920/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. शिराढोन यांच्या पथकास आढळला.


   यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद तीघांविरुध्द म.दा.का. अंतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.


 

Post a Comment

0 Comments