लोहाऱ्याच्या गुरुजींचा प्रामाणिकपणा... सापडलेले पैसे केले परत...


लोहारा : शहरातील एका जिल्हा परीषदेचा शिक्षक असलेल्या माजी पंचायत समिती सदस्याने आपला प्रामाणिक पणा दाखवत सापडलेले पैसे पोलीसांच्या मदतीने परत करुन माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.


     लोहारा शहरातील जिल्हा परीषदेचे शिक्षक सुधीर घोडके हे तालुक्यातील हिप्परगा रवा जिल्हा परीषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.  शुक्रवार म्हटले की लोहारा शहराचा आठवडी बाजार. या बाजारसाठी तालुक्यासह परजिल्ह्यातून व्यापारी,नागरीक मोठ्यासंख्येने येतात. त्यातच शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारात शहरातील भारतीय स्टेट बॅकेच्या शाखेसमोर पॉकीट सापडले, त्यात ३९७० रुपये होते. 


त्यात संबंधीत व्यक्तीचे पॅनकार्ड, ड्राव्हिंग लायन्स होते. त्यावरुन ओळख पटली.तो व्यक्ती तालुक्यातील बेलवाडी येथील सुनील धनाजी चव्हाण हे लक्षात आले. लगेच शिक्षक सुधीर घोडके यांनी पोलीसांशी संपर्क साधून सर्व माहीती दिली, त्यानंतर  सुनील धनाजी चव्हाण यांना लोहारा पोलीस ठाण्यात बोलावून पोलीसांच्या हस्ते पैशाचे पॉकीट देण्यात आले.


 यावेळी शिक्षक सुधीर घोडके, आयुब शेख,दादा पाटील,पोकॉ अनिल बोधनवाड,पोपट शिरसागर, विजयकुमार कोळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments