मराठा आरक्षण : खा.ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेत आवाज उठवला ( video)

 

उस्मानाबाद - मराठा  आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने मराठा समाजात असंतोष पसरला आहे. केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून  मराठा  समाजावरील आरक्षणा बाबतीतील अन्याय दूर करावा अशी विनंती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  आज लोकसभेत शुन्य प्रहाराच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली.


खा. ओमराजे निंबाळकर म्हणले, मराठा समाज 1989 पासून नौकरी साठी व शिक्षणासाठी आरक्षणाची सातत्याने  मागाणी करत आहे व या समाजातील असंख्य तरुण तरुणीनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती  दिली. आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने अतिशय शांततेत व संयमी मार्गाने मोर्चे काढले व यशस्वी केले व याचा परिपाक म्हणून राज्य सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये 16 टक्के आरक्षण दिले पण दुर्दैवाने 9 सप्टेंबर 2020 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने या मराठा आरक्षणास स्थगिती मिळाली. याचा फार मोठा असंतोष मराठा समाजात पसरला आहे. 


संविधानाच्या कलम 15(4) च्या तरतुदीनुसार राज्य सरकारला शैक्षणिक व सामाजिक दृष्टया मागासलेल्या समाजासाठी आरक्षण देण्याचा अधिकार आहे व त्या नुसारच हे आरक्षण दिले गेले होते जर तामिळनाडू मध्ये  69 टक्के आरक्षण दिलेलं टिकत असेल तर महाराष्ट्र मध्ये मराठा समाजाला दिलेले आरक्षण का टिकू शकत नाही हा महाराष्ट्रातील मराठा समाजावर अन्याय आहे तरी केंद्र सरकारने याबाबत लक्ष घालून  मराठा  समाजावरील आरक्षणा बाबतीतील अन्याय दूर करावा अशी विनंती खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी  आज लोकसभेत शुन्य प्रहाराच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे केली.Post a Comment

0 Comments