जिल्ह्याधिकाऱ्यांच्या एका कृतीमुळे त्या दिव्यांग व्यक्तीच्या अंगात हत्तीचे बळ !



उस्मानाबाद - उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर   यांनी   दिलेली वागणूक ही माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना आहे. असा अधिकारी कधीही पाहिली नाही. आता मी दिव्यांग नाही तर माझ्या अंगात हत्तीचे बळ आले आहे. जगात माणुसकी आहे, चांगली माणसं आहेत, अधिकाऱ्यंामध्ये माणुसकी आहे, याचा प्रत्यय आला.दिवेगावकर सरांबद्दल बोलण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत, हे उदगार  आहेत, दिव्यांग  जनता दलाचे जिल्हाध्यक्ष  रसूलभाई सय्यद यांचे. 


गाऱ्हाणं घेऊन गेल्यानंतर उच्च पदस्थ अधिकारी आपलं बोलणं ऐकून घेतील का, अशी सर्वसामान्य माणसांच्या मनात शंका असते. मात्र, उस्मानाबादच्या दिव्यांग रसुल सय्यद यांना आश्चर्यकारक अनुभव आला. दिव्यांग संघटनेच्या शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी ते सोमवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. त्यांचे निमंत्रण घेण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर जमिनीवर बसले. हा फोटो उस्मानाबाद लाइव्हने सर्वप्रथम प्रसिद्ध करताच, जिल्हाधिकाऱ्यांच्या या साधेपणाची दिवसभर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा 

उस्मानाबाद : दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर स्वतःची खुर्ची सोडून चक्क जमिनीवर बसले !


उस्मानाबादचे नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर हे आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यास सुरुवात केली आहे. रुग्णाची लूट करणाऱ्या सह्याद्री हॉस्पिटलला दहा हजार दंड केल्यामुळे  एक कतर्व्यदक्ष  जिल्हाधिकारी म्हणून त्याची छबी उमटली आहे.  त्यात  एका दिव्यांग दिव्यांग व्यक्तीची समस्या ऐकण्यासाठी जिल्हाधिकारी चक्क जमिनीवर बसल्याचा फोटो पाहून अनेकांना कौतूक वाटत आहे. 


नेमके काय घडले ? 

उस्मानाबाद नगर पालिकेच्या प्रवेशद्वारावर झेरॉक्सचा व्यवसाय असलेले मुळचे रसूलभाई सय्यद दिव्यांग  जनता दलाचे जिल्हाध्यक्ष आहेत. या संघटनेचा मेळावा १४ ऑक्टाेबर रोजी असून, याच दिवशी शाखेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या शाखेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी ते सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले होते. दिव्यांग बांधवाला पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना कार्यालयात येऊ देण्याची परवानगी दिली.


 रसुलभाई दोन पायाने आणि एका हाताने दिव्यांग आहेत. ते एका हातावर चालत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते. त्यांना खुर्चीवर बसता येत नसल्याने जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी त्यांची खुर्ची सोडली. रसुलभाई यांच्याजवळ मांडी घालून खाली बसून त्यांनी संवाद साधला. त्यानंतर रसुलभाई यांच्या विनंतीवरून फोटो काढण्याची परवानगी दिली. या फोटो उस्मानाबाद लाइव्हवर व्हायरल होताच, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर याच्या माणुसकीबद्दल कौतूकाचा वर्षाव होत आहे. 


उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात समस्या घेऊन आलेल्या व्यक्तीला खुर्चीवर बसता येत नाही म्हणून  स्वतःची ख्रुर्ची सोडून जमिनीवर बसणारे कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबादचे पहिले जिल्हाधिकारी आहेत, हे येथे  उल्लेखनीय. 

Post a Comment

0 Comments