--> उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशीची मागणी | Osmanabad Today

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशीची मागणी

लातूर  - उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबाद ही मराठवाड्यातील एकमेव मोठी बँक आहे. या बँकेत सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या प्रमाणात ठे...


लातूर  - उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबाद ही मराठवाड्यातील एकमेव मोठी बँक आहे. या बँकेत सर्वसामान्य जनतेच्या मोठ्या प्रमाणात ठेवी आहेत. या बँकेचे विद्यमान संचालक मंडळ मागील चार-पाच वर्षांपासून अत्यंत बेजबाबदारपणे व आरबीआयच्या मापदंड परिपत्रकाचे पालन न करता स्वहितासाठी नियमबाह्य व मनमानी काम करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांनी जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे केली आहे. 


बँकेच्या संचालक मंडळाची मुदत सप्टेंबर २०२० मध्ये संपत असल्याने मागील वर्षभरात तर नियमबाह्य व स्वतःच्या स्वार्थापोटी बेभान होऊन कर्जदाराची उत्पन्न क्षमता न पाहता कोट्यावधी रुपये कर्ज वाटपाचा सपाटाच लावला असल्याचे बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी म्हटले आहे. 


बँकेच्या संचालक मंडळाची मुदत दिनांक २४/०९/२०२० रोजी संपलेली आहे. संचालक मंडळाची मुदत संपली असल्यामुळे ताबडतोब बँकेच्या नवीन संचालक मंडळासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर  करणे आवश्यक असताना तसा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न करता व सदरील संचालक मंडळास केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांची संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली नसताना सुद्धा सदरील संचालक मंडळ बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा जी की बँकेच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून ती सर्वसाधारण सभा दिनांक १८/१०/२०२० रोजी घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 


नागरी सहकारी बँका साठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासंबंधी माननीय केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांनी अटी व नियम तसेच सर्वसाधारण सभा कशाप्रकारे घेण्यात यावी यासंबंधीचे मार्गदर्शक तत्वे व सूचना दिनांक २५/०८/२०२० रोजी परिपत्रक काढून कळविलेले असताना त्या नियमांचे पालन न करता ही सभा घाईगर्दीत घेऊन मागील आर्थिक वर्षातील नियमबाह्य केलेल्या कामकाजास व आर्थिक व्यवहारास मान्यता घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. जो की बँकेच्या हिताच्या दृष्टीने व ठेविदारांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकते. असा सावधानतेचा इशारा ज्येष्ठ पत्रकार व बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी एका निवेदनाद्वारे रिझर्व बँक ऑफ इंडिया यांना दिला आहे. 


तसेच उस्मानाबाद जनता सहकारी बँक लिमिटेड उस्मानाबादच्या बेकायदेशीर व नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई आणि जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्बन बँक विभाग नागपूर यांच्याकडे व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.

COMMENTS

Name

VIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,
ltr
item
Osmanabad Today : उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशीची मागणी
उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशीची मागणी
https://1.bp.blogspot.com/-SucYhRvG_Rc/X27w_Vy_DcI/AAAAAAAAhtc/WwgaPBmv4KgfMu4o9iPYcLVW1wAgbUINACLcBGAsYHQ/s320/d7a76a3a-cbb0-48c9-98c6-7fd69484418a.jpg
https://1.bp.blogspot.com/-SucYhRvG_Rc/X27w_Vy_DcI/AAAAAAAAhtc/WwgaPBmv4KgfMu4o9iPYcLVW1wAgbUINACLcBGAsYHQ/s72-c/d7a76a3a-cbb0-48c9-98c6-7fd69484418a.jpg
Osmanabad Today
https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-Janta-Bank-administration.html
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/2020/09/Osmanabad-Janta-Bank-administration.html
true
1604299900197800352
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content