महाराष्ट्र सरकारकडून लोकशाहीचा खून - भोसले

महाराष्ट्रातील झोटिंगशाही थांबविण्यासाठी केंद्र सरकारने 
हस्तक्षेप करावा  -   अॅड रेवण भोसले

उस्मानाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख ,खा. शरद पवार, खा. संजय राऊत यांना कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या नावाने कोणीतरी अज्ञात व्यक्तीने  धमकीचे फोन केल्या नंतर त्यांना सडेतोड प्रत्युत्तर देण्याऐवजी महाराष्ट्र सरकारने मुंबई महापालिकेला हाताशी धरून कंगना राणावत नावाच्या एका महिलेच्या कार्यालयाचे बांधकाम हे अनधिकृत असल्याचा कांगावा करून पोलीसबळ व प्रशासनामार्फत बुलडोजरच्या साह्याने जमीनदोस्त करण्याचे कुटील कारस्थान महाराष्ट्र सरकारने केले आहे.

कंगनाच्या कार्यालयाचे बांधकाम हे अनधिकृत असल्याची नोटीस आदल्या दिवशी देऊन दुसऱ्या दिवशी लगेच मुंबई महापालिकेने ते बांधकाम पाडण्याचा पराक्रम केलेला आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या नोटीस चे उत्तराची वाटही पाहिली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात 'अंधा कानून 'सुरू असून महाराष्ट्र सरकारकडून लोकशाहीचा खून झाला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात सुरू असलेली झोटींगशाही थांबविण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केली आहे.

     कंगना राणावतने महाराष्ट्रातील काही नेते, अभिनेते हे ड्रग माफियात गुंतले असणाऱ्यांची नावे सांगू नयेत म्हणून तिचे तोंड दाबण्यासाठी अशा प्रकारचे तोडकामासारखे खालच्या पातळीवरचे कृत्य मुंबई महापालिकेने केले आहे.राज्यातील कोरोनाची स्थिती ,आरोग्य व्यवस्था ,पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील पूर. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ,कष्टकरी कामगार, श्रमिक, बेरोजगार तरुण यांचे प्रश्न बाजूला ठेवून  महाराष्ट्र सरकार राज्यात अराजकसदृश्य परिस्थिती निर्माण करून आपणास येत असलेल्या अपयश झाकण्यासाठी कसोशीने हे सरकार प्रयत्न करत आहे.

    जनतेच्या प्रश्नावर बाजू मांडणारे व अन्यायाला वाचा फोडणारे पत्रकार, प्रसार माध्यमे, वृत्तवाहिनी माध्यमे यांच्यावरही महाराष्ट्र सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे .महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी सरकारकडून चालू आहे. सरकारचे अपयश चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकार व प्रसार माध्यमाच्या संपादकांवर महाराष्ट्र सरकार कारवाई करून धमकावीत आहे.

    महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघाले आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हेच वारंवार वेगवेगळ्या प्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील जनतेमध्ये व महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण तयार करत आहेत. मुंबई महापालिकेने कंगना राणावतला अनधिकृत बांधकाम प्रकरणी दिलेल्या नोटीसला उत्तर देण्यासाठी पुरेशी संधी न  देता बुलडोजरने कार्यालय जमीन दोस्त करणाऱ्या मुंबई महापालिकेचा जनता दल तीव्र निषेध करत आहे .मुंबई महापालिकेने कंगना राणावतच्या कार्यालयाचे बांधकाम बुलडोजरने पाडण्यास मुंबई उच्च न्यायालयानेआता  स्थगिती दिली आहे .


महाराष्ट्रात अभूतपूर्व निर्माण झालेली अराजकसदृश  परिस्थितीचा अहवाल राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी् केंद्र सरकारकडे पाठवून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी तसेच महाराष्ट्रात वारंवार सुरू असलेली झोटींगशाही थांबविण्यासाठी केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणीही ॲड. भोसले यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments