सा. बां . विभागाचे कार्यकारी अभियंता झगडे यांच्या काळात अनेक बोगस कामे

चौकशी करण्याची बहुजन विकास मोर्चाची मागणी उस्मानाबाद -   सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत उस्मानाबाद -कळंब-भूम -वाशी- परंडा आदी ठिकाणी सन  २०१७ ते २०२० या  दरम्यान करण्यात आलेली कामे बोएग्स झालेली असून, या   बोगस कामाची चौकशी करण्याची मागणी बहुजन विकास मोर्चाने केली आहे.
 
यासंदर्भात अधीक्षक अभियंत्यास निवेदन देण्यात आले असून, त्या म्हटले आहे की ,  महाराष्ट्रातील सां बां विभागा मार्फत पारदर्शक कामे करण्याचा दावा सरकार करत आहे मात्र काही उस्मानाबादचे सा. बां . विभागाचे कार्यकारी अभियंता झगडे त्याला 'हरताळ' फासताना दिसत आहेत.

२०१७ ते २०२० या  कार्यकाळात उस्मानाबाद कळंब भूम वाशी परंडा अंतर्गत रस्ते नाला बंधारे इमारतींच्या कामाची दुरावस्था झालेली  दिसून येत आहे तसेच बरेच ठिकाणी रस्ते न बनवता पैसा लाटण्याचे काम अधिकाऱ्यांच्या वरद हस्तामुळे गुत्तेदार यांनी केल्याचे दिसून येत आहे.

मागील  तीन वर्षात  कार्यकारी अभियंता  झगडे यांनी गुत्तेदारांना संगनमत करून आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी पद्धतीने टेंडर काढून त्यांच्या सोयीने गुत्तेदार यांचे लागेबांधे करून निधी ठेकेदारांच्या घशात घालण्याचा डाव त्यांनी केला असून अनेक कामे ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून टेंडर मधील अटी शर्ती असण्याचा दावा त्यांनी केला असून यासाठी बेहीशेबी मालमत्ता जमा केली आहे आणि  त्यांच्या संपत्तीची व सर्व कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमून तात्काळ सखोल चौकशी करण्यात यावी व त्यांच्या कार्यकाळातील गैरव्यवहार उघडकीस आणवा  अन्यथा दिनांक १३/०९/२०२० रोजी पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येतील याची नोंद घ्यावी, असेहि या निवेदनात म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments