कोरोनामुळे मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रद्द            उस्मानाबाद -एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशपुर्व स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचे प्रस्तावित होते, तथापी कोरोना (कोविड 19) विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सद्यस्थितीत राज्यातील सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

         तसेच ऑनलाईन परिक्षा घेण्याकरीता परिस्थिती अनुकुल नाही, यास्तव एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल शैक्षणिक वर्ष सन 2020-2021 प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेशपुर्व स्पर्धा परीक्षा रद्द करुन त्या ऐवजी विद्यार्थ्याच्या मागील वर्षाच्या (शैक्षणिक वर्ष 2019-2020) पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार निवड करणे करीता शासनाने मान्यता दिली आहे.

         ऑनलाईन परीक्षा रद्द झाल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र भरले आहे. अशा सर्व विद्यार्थ्याची शैक्षणिक वर्ष सन 2019-20 मधील सातत्यपुर्ण सर्वकष मुल्यमापन पध्दतीचा अवलंब करुन करण्यात आलेल्या आकारीक व संकलीत मुल्यमापन पध्दतीद्वारे तयार केलेल्या प्रथम सत्रांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.

          एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल इ. 6 वी च्या वर्गात नविन प्रवेश व इ. 7 वी ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्याच्या रिक्त जागा भरण्याकरीता शैक्षणिक वर्ष सन 2020-21 करीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करुन मागील शैक्षणिक वर्षातील प्रथम सत्राच्या गुणांच्या आधारे गुणानुक्रमे विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.     

        तसेच विद्यार्थ्याचे प्रवेश हे त्यांच्या पालकांच्या मुळच्या राहण्याच्या पत्त्यानुसार प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये देण्यात येतील, तसेच ज्या प्रकल्पांतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल नाही.

       अशा प्रकल्पातील विद्यार्थ्याना लगतच्या प्रकल्पात कार्यान्वित असलेल्या शाळेत प्रवेश देण्यात येईल.तरी सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत जाहिर आवाहन करण्यात येत आहे.

       संपर्कासाठी प्रकल्प कार्यालयाचा पत्ता:- प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर. प्लॉट नं-2 डॉ बाबासाहेब आंबेडकर सोसायटी आर्कीटेक्ट कॉलेजजवळ, कुमठा नाका परिसर, सोलापूर दुरध्वनी क्र. ०२१७-२६०७६००   

Post a Comment

0 Comments