प्रकरण दाबले ! झेडपीच्या 'त्या' अधिकाऱ्यावर जुजबी कारवाई ...
उस्मानाबाद - लॉकडाऊनचे नियम तोडून पुणे आणि औरंगाबाद वारी करणारे झेडपीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) अजिंक्य पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.जी. केंद्रे यांच्यावर तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी जुजबी कारवाई करण्याचे आदेश झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना  दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लॉकडाऊनचे नियम तोडून उस्मानाबाद झेडपीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) अजिंक्य पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.जी. केंद्रे यांनी पुणे आणि औरंगाबाद दौरा केला होता. हे प्रकरण उस्मानाबाद लाइव्हने उघडकीस आणले होते तर आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी प्रकरण उचलून धरले होते.

झेडपीच्या या अधिकाऱ्यावर  सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे कारवाई होणे अपेक्षित होते पण गेले चार महिने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी हे कारवाईचा  चेंडू एकमेकांच्या दालनात फिरकावत बसले होते.

 तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी दिलेल्या निर्देशा प्रमाणे निवासी उप जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश देताना, अजिंक्य पवार आणि  एस.जी. केंद्रे   यांना  सक्त ताकीद देऊन ठपका ठेवण्याच्या अनुषगाने कारवाई करावी, इतकेच म्हटले आहे. एकाद्या सर्वसामान्य व्यक्तीने लॉकडाऊनचे नियम तोडले तर तात्काळ गुन्हा दाखल होतो पण सनदी अधिकाऱ्यावर मात्र अशी कोणतेही कारवाई होत नाही, हेच यावरून दिसून आले आहे.

गुन्हा दाखल करावा - सुभेदार
 

केवळ ठपका ठेवणे ही  कारवाई होऊ शकत नाही, सर्वसामान्य नागरिकांवर जसा गुन्हा दाखल होतो, त्याप्रमाणे झेडपीच्या  अधिकाऱ्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्याकरिता कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात पुर्नविचार करावा, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार असलयाचे आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितले.
Post a Comment

0 Comments