उस्मानाबाद जिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी


उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी भाजपचे  माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. 


 या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की , जिल्ह्यात आत्तापर्यंत १०२६५ इतके कोविड-१९ चे बाधित रुग्ण होते. त्यापैकी साधारण ७१६६ इतक्या संख्येने रुग्ण उपचारानंतर ठीक झाले. उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. या कोविड-१९ ची उपचारानंतर रुग्ण बरा झाल्यानंतर सुद्धा अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतोय. 


कोरोनाचा रुग्ण बरा झाल्यानंतर त्याला आजाराचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. मानसिक अस्वस्थता, थकवा, छातीत दुखणे, श्वास अडकल्यासारखे वाटणे, नैराश्य जाणवणे, रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळा येणे, बोलताना त्रास होणे, घसा खवखवणे यासारखे व अन्य आजार किंवा त्रास रुग्णांना कोरोणा उपचार घेऊन रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सुद्धा जाणवत आहेत.


 वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांच्या माहितीनुसार या कोविड-१९ चे परिणाम दीर्घकाळ पणे राहतात. या कालावधमध्ये रुग्णांनी घ्यावयाची काळजी किंवा या विषयीचे समुपदेशन करण्याची आवश्यकता सध्या जाणवत आहे. त्याकरिता जिल्हा रुग्णालया मार्फत एक पोस्ट कोविड सेंटर चालू करावे ज्याद्वारे वरील रुग्णांना याचा उपचारासाठी लाभ घेता येईल.


Post a Comment

0 Comments