जिल्हयात 1 ते 30 सप्टेंबर हा कालावधी पोषण महिना म्हणून साजरा होणार            उस्मानाबाद :-महिला व बाल विकास विभाग यांच्या आदेशान्वये 01 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2020 " पोषण महिना " म्हणून साजरा केला जात आहे. या कार्यक्रमाचा मुख्य उददेश " कुपोषण निर्मुलन " हा आहे. या कार्यक्रमाची  सुरुवात एकात्मिक बाल विकास प्रकल्प उस्मानाबाद ( ग्रामीण ) मध्ये विभाग पाडोळी या गावातून झाली. " पोषण महिना " अभियानाचे उदघाटन बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल ब.कांबळे व विस्तार अधिकारी  किशोर वंजरवाडकर यांनी केले.

        या कार्यक्रमात गरोदरमाता, स्तनदामाता यांना पोषणाचे महत्व समजावून सांगितले तसेच पोषक पदार्थ कसे बनवावे यासाठी " पोषक पाककृती " चे प्रदर्शन अयोजित केले होते. यात ग्रामस्तरावरच मिळणा-या रानभाज्या यांच्या पासून वेगवेगळे पोषक पदार्थ कसे बनवता येतील या बददल मार्गदर्शन केले.

          तसेच " कुपोषीत मुलांना " सर्व साधारण श्रेणीत कसे आणावे. त्याचे आहाराचे वेळापत्रक कसे असावे. या बददल मार्गदर्शन केले. गरोदरमाता, स्तनदामाता यांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार केला. मुलींच्या जन्माचे स्वागत करावे. यासाठी जाणीव जागृती केली. या कार्यक्रमात नव्याने रुजू झालेले बाल विकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे यांनी " पोषण महिना " कसा साजरा करावयाचा त्याचे प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक समजवून सांगितले. तसेच अंगणवाडी मदतनीस माया शिराळ यांनी  पोषण बददल स्वत:ची कविता सादर केली.                                                         

          या कार्यक्रमास गावच्या सरपंच सौ. कौशल्या सुधाकर गुंड व ग्रामपंचायत सदस्य मैनाताई बंकट कासार हे ही उपस्थित होत्या. तसेच अंगणवाडी सेविका- माधवी शिराळ, साविता ढाकरे, अलका बोचरे, मिना कांबळे, सत्यशिला स्वामी, अर्चना सुतार,  व अंगणवाडी मदतनीस-सोजरबाई ढाकेरे , भाग्यश्री कांबळे, शिवगंगा शिराळ, संगिता दाताळ, भामाबाई कांबळे, माया शिराळ, उपस्थित होत्या. व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती सुकाळे व्ही.व्ही. पर्यवेक्षिका विभाग पाडोळी यांनी केले. व कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती लोंढे व्ही.बी. पर्यवेक्षिका विभाग बेंबळी यांनी केले.

Post a Comment

0 Comments