उस्मानाबाद - भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांची महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी किसान आघ...
उस्मानाबाद - भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांची महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या मराठवाडा पुर्व संपर्क प्रयुख पदी निवड करण्यात आली आहे. किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, किसान आघाडीचे प्रभारी तथा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकुर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या मान्यतेने दि 1 सप्टेंबर 2020 रोजी ही घोषणा केली. विदयार्थी दशेपासून भाजपाचे निष्ठावंत म्हणून ओळख असलेले रामदास कोळगे यांच्या या निवडीमुळे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
1989 पासून भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कामास सुरुवात केलेल्या रामदास कोळगे यांनी भाजपा पक्ष संघटनेमध्ये गाव कार्यकर्ता ते जिल्हा उपाध्यक्ष असा प्रवास करत भाजपाच्या अनेक पदावर काम करीत असताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. यामध्ये भाजपा तालुका सरचिटणीस, तालुका अध्यक्ष, भारतिय जनता युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस, जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस व आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.
ग्रामिण भागात शेतकरी, शेतमजुर, जनसामान्य यांची कायम नाळ जोडून ते पक्षाचे काम करीत असल्यामुळे सलग तीन वेळा पंचायत समितीवर निवडून आले. त्या काळात दोन वर्ष उपसभापती म्हणून ही काम पाहिले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येवून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. पडत्याकाळात भाजप पक्ष ग्रामीण भागात तेवत ठेवण्याचे केवळ काम न करता पक्षाच्या पदरी यश मिळवण्यातही ते यशस्वी झाले.
सत्ताकाळात महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाकडून मराठवाडयासाठी अटल अर्थसहाय्य योजनेवर विभागीय सदस्य पदी त्यांची निवड करुन पक्षाने त्यांना संधी दिली. सतत 31 वर्ष भाजपाचे निष्ठावंत, निष्कलंक व प्रामाणिकपणे ते काम करत असल्याची दखल घेऊन राज्य नेतृत्वाने त्यांना भाजपा महाराष्ट्र प्रदेश किसान आघाडीच्या पुर्व मराठवाडा संपर्क प्रमुख पदी संधी दिली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शेतकयासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात आनंद व्यक्त होत आहे.

COMMENTS