उस्मानाबाद जिल्ह्यात चोरीचे 6 गुन्हे दाखल
कळंब: इस्तीया तारेख काझी, रा. भोई गल्ली, कळंब यांनी त्यांच्या व्यवसायासाठी आणलेले साहित्य माकेंट यार्ड, कळंब येथील गुदामात ठेवले होते. दि. 23 ते 24.09.2020 या कालावधीत त्या गुदामाचा दरवाजा एका अनोळखी मुलाने ढकलून उघडला आणि आतील मर्सलिंग- 80 नग, एफबीएस- 10 नग, जीआय बॉक्स- 670 नग, फॉन बॉक्स- 450 नग, सेंट्रींग पाईप्स- 180 नग, जुने जनरेटर इत्यादी साहित्यासह प्रियदर्शनी विकास मंडळाची मुळ प्रमाणपत्रे असलेली बॅग असा एकुण 3,86,596/-रु. चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या इस्तीया काझी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा दि. 25.09.2020 रोजी नोंदवला आहे.


 उमरगा: ओमप्रकाश रामचंद्र वाघमारे, रा. उमरगा यांच्या गुगळगाव येथील शेत विहीरीतील लाडा लक्ष्मी कंपनीचा 3 अश्व शक्ती क्षमतेचा पानबुडी विद्युत पंप दि. 20 ते 25.09.2020 या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. अशा मजकुराच्या ओमप्रकाश वाघमारे यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


तामलवाडी: उमेश उत्तम राऊत, रा. सावरगाव, ता. तुळजापूर यांच्या बंद घराचे कुलूप दि. 25.09.2020 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने तोडून आतील अंदाजे 14 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 8,000/-रु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या उमेश राऊत यांनी दि. 26.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उमरगा: ज्ञानेश्वर दत्तात्रय मुरमे, रा. महादेव गल्ली, उमरगा यांनी दि. 20.09.2020 रोजी 16.00 वा. सु. हिरो स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 24 झेड 9739 ही कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेताच्या कडेला लावली होती. ते शेतातुन 17.00 वा. सु. परत आले असता लावल्या जागी ती मो.सा. आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या ज्ञानेश्वर मुरमे यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


  लोहारा: आबा विमल शिंदे, रा. समुद्राळ, ता. उमरगा यांनी दि. 23.09.2020 रोजी रात्रीच्या सुमारास होंडा ड्रिम युगा मो.सा. क्र. एम.एच. 14 ईझेड 2863 ही आपल्या घरासमोर ठेवली होती. ती त्यांना दुसऱ्या दिवशी ठेवल्या जागी आढळली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या आबा शिंदे यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


उस्मानाबाद (ग्रा.): पंकज जयलिंग लिंगे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 23.09.2020 रोजी 21.00 वा. आपली हिरो पॅशन प्रो मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 2107 ही राहत्या घरासमोर लावली असता मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. यावरुन पंकज लिंगे यांनी दि. 25.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments