नागरिकांत भीतीचे वातावरण सावरगाव - तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवार दि. २६ रोजीच्या मध्यरात्रीच्या तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चो...
नागरिकांत भीतीचे वातावरण
सावरगाव - तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे शनिवार दि. २६ रोजीच्या मध्यरात्रीच्या तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावातील वेगवेगळ्या तीन ठिकाणी घरफोडी करून सोने, चांदी सह मुद्देमाल लंपास केला आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावरगाव येथील दुरगाडी वस्तीवर राहणारे उत्तम गणपती राऊत यांच्या घरातील पेटीत ठेवलेले अडीच तोळे सोने,आठ हजाराच्या रोख रक्कम एकूण दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे,तर येथूनच अवघ्या काहीअंतरावर असलेल्या पोपट रामचंद्र झरेकर यांच्या व त्यांचे भाडेकरू असलेल्या आकाश तावरे यांच्या खोल्यांचे दरवाजे उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला घरफोडी करून हाती काहीच न लागल्याने घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरट्यांनी तेथून पळ काढला ,तर पशुवैद्यकीय दवाखान्याच्या पाठीमागे राहणारे बाबा गायकवाड यांच्या घरावर डल्ला मारत चोरट्यांनी एक तोळे सोने व पत्र्याचे शेड मारण्यासाठी ठेवलेले चाळीस हजाराच्या रक्कमेसह सुमारे नव्वद हजाराचा मुद्देमालावर डल्ला मारला.
चोरीच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तामलवाडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुबोध जमदाडे,पोलीस कर्मचारी माने ,ओव्हळ यांनी पंचनामा केला. गावात एकाच रात्री चोरट्यांनी तीन ठिकाणी चोरी केल्याने गावातील नागरिकात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी पेट्रोलिंग करावे अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पोलीसांनी गाडीतून श्वान उतरवले नाही...
शनिवारी मध्यरात्री सावरगावात एकाच रात्री तीन ठिकाणी चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. चोरट्यांच्या शोधासाठी शान पथक आणण्यात आले पण घटनेनंतर उशीर झाला आहे असे कारण देत पोलिसांनी घटनास्थळावर श्वानास न आणता गाडी मध्ये ठेवले होते ,तर घटनास्थळी ठसे तज्ञ व पथकाला पाचारण केले होते,ठसे तज्ञांनी घटनास्थळाचे काही ठसे घेतले आहेत.....
COMMENTS