वाशी : दोन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी


 वाशी - जुन्या बसस्थानक परिसरात मंगळवारी (दि.२९) दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून एका सेवानिवृत्त व कार्यरत पोलिस अधिकाऱ्यामध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली, त्याची वाशी शहर आणि परिसरात चवीने चर्चा सुरु आहे.. 


कर्फ्यू सोमवारी संपल्याने मंगळवारी संपूर्ण बाजारपेठ उघडली होती. दुपारी १ च्या सुमारास शहरातील जुने बसस्थानक परिसरमध्ये शहरातील रहिवाशी असलेल्या एका सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावली होती. यावेळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक अधिकारी या भागातून आपल्या चारचाकी वाहनाने पोलिस ठाण्याकडे जात असताना त्यांनी सदरील निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला दम देत गाडी बाजूला घेण्याचे सांगितले. यामुळे दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर हणामारीमध्ये झाले होते. 


कायदा व सुव्यवस्थेच्या क्षेत्रात असलेल्या दोघांमध्ये हाणामारी झाल्याने व दोघेही मागे हटण्यास तयार नसल्याने हा चर्चेचा विषय झाला. हा परिसर म्हणजे वाशी बाजारपेठेचा मुख्य भाग असल्याने नेहमीप्रमाणे या ठिकाणी नागरिकांची रहदारी असल्याने बघ्यांचीही गर्दी जमली होती. यावेळी शहरातील एका माजी लोकप्रतिनिधीने मध्यस्थी करून हे भांडण मिटविले.


वाशी पोलीस ठाण्याचे सपोनि- श्री अशोक चव्हाण हे दि. 29.09.2020 रोजी 13.30 वा. सु. वाशी येथील शिवाजी चौकातून पोलीस ठाण्याकडे जात होते. यावेळी रस्त्यात असलेल्या वाहनाचा अडथळा होत असल्याने त्यांनी समोरील वाहन चालक- सुरेश रणदिवे, रा. वाशी यांना गाडी पुढे घेण्यास सांगीतले. यावर सुरेश रणदिवे यांनी, थांबरे पाच मिनीट, तुला काय एवढी गडबड आहे. तु लय माजलास काय. असे अपशब्द वापरले. याचा जाब सपोनि- चव्हाण यांनी रणदिवे यांना विचारताच रणदिवे यांनी सपोनि- चव्हाण यांना शिवीगाळ करुन त्यांची गचांडी धरुन त्यांस ढकलून देउन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा प्रकारे सुरेश रणदिवे यांनी पोलीसांच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन सपोनि- अशोक चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506 सह मो.वा.का. कलम- 122/177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments