उस्मानाबाद - सध् या राज्यभरात कोव्हीड - 19 प्रादूर्भावामुळे स्थलांतरीत कामगारांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभु...
उस्मानाबाद -सध्
या उपाय योजनांचा भाग म्हणून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद यांचे संयुक्त विद्यमाने खाजगी क्षेत्रातील नामांकित प्रतिथयश उद्योजक/ कंपनी यांचेकडील 402 पदे भरण्यासाठी पात्र व इच्छुक पुरूष उमेदवारांच्या ऑनलाईन पध्दतीने (स्काईप/व्हॉटसअप/फोनकॉल) माध्यमातून मुलाखती घेउन निवड प्रकिया करणार आहेत.
अ.क्र | उद्योजकाचेनाव | पदाचेनाव | संख्या | शैक्षणिक पात्रता | वय |
1 | Security &Intellgence Services India Ltd, (SIS) Pune. | सिक्युरिटीगार्ड/ सुपरवायझर. | 200मुले | 10 वी/12 वी पास. | 21 ते 36 |
2 | Piaggio Vehicles Private Ltd, MIDC, Baramati, Pune. | जॉब ट्रेनी | 100मुले | ITI – Fitter/Turner/ Painter/ Diesel Mech / Motor Mech / Welder/ Sheet Metal /Machinist. HSC MCVC- Auto | 19 ते 28 |
3 | SMP Corporation, Pune +ÆiÉMÉÇiÉ | ||||
Valeo India Pvt Ltd. | ऑपरेटर | 42 मुले | ITI – Fitter/Turner / Diesel Mech / Motor Mech | 18 ते 26 | |
Concentric Pumps Pvt Ltd. | ऑपरेटर | 56 मुले | ITI – Fitter/Turner / Diesel Mech / Motor Mech | 18 ते 26 | |
4 | Gurukrupa Engineering Works, MIDC Osmanabad. | वेल्डर/ टर्नर | 04 मुले | ITI – Welder / Turner | 20 ते 45 |
· वेतन :- पद व शैक्षणिक योग्यतेनूसार राहील.
· सुविधा:- कॅन्टीन, निवास, ट्रान्सपोर्टेशन इ. सुविधा याबाबत संबधित कंपनीच्या नियमानुसार, ऑनलाईन/फोनकॉल मुलाखतीच्या वेळी कंपनीचे अधिकारी सविस्तर माहिती व मार्गदर्शन करतील.
· कार्यालयाचा संपर्कासाठी दुरध्वनी क्र : 02472 – 222236
· महत्वाची सुचना -दिनांक 29 सप्टेंबर 2020 ते 05ऑक्टोबर 2020 पर्यंत उमेदवार ऑनलाईन अप्लाय करू शकतील. त्यानंतर संबधित उद्योजक/कपंन्याकडून मुलाखती/ निवड याबद्दल उमेदवारास वेळोवेळी कळविण्यात येऊन पुढील प्रकिया करण्यात येईल.
या ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या
संकेतस्थळावर जॉबसिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करुन आपल्या प्रोफाईल मध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रतेचा
तपशील मोबाईल, ई-मेल, पत्ता अद्यावत करावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी पुढीलप्रमाणे स्टेप्स कराव्यात.
Jobseeker Login > Enter Aadhar Id/ Registration Id > My Profile >Pandit Dindayal Upadhyay Job Fair > District Select > Osmanabad> Click Vacancy Listing > मधून दिसणाऱ्या रिक्तपदानूसार आपल्या शैक्षणिक पातत्रेनूसार पात्र असलेल्या पदासाठी अप्लाय करावेत.
या ऑनलाईन रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी सहभागी व्हावे असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
COMMENTS