प्रतिबंधात्मक उपायोजनेची पर्यवेक्षण करण्याकरीता लोंढे यांची नियुक्ती            उस्मानाबाद -महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम, 2020 प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र. 3 नुसार करोना विषाणुमुळे (COVID-19) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे.

         उस्मानाबाद जिल्ह्यामधील सर्व नगर परिषदा/नगर पंचायतीमार्फत कोविड-19 च्या करण्यात येणा-या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पर्यवेक्षण करणेकरिता जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, लोंढे (9689884341) यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केली आहे. तसेच सहाय्यक अधिकारी- संबंधित तालुक्याचे उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी काम करावे.

खालीलप्रमाणे कामकाज :-

          उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नगर परिषदा/नगर पंचायती यांचेमार्फत कोविङ-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पर्यवेक्षण करणे व या प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित मुख्याधिकारी यांना सूचना देणे.

 नगर परिषदा/नगर पंचायतींच्या हद्दीमध्ये स्वच्छता, साफसफाई, निर्जतुकीकरण, जनजागृती, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमिटरद्वारे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी, कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहिम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) व त्यांचे विलगीकरण (Quarantine), सामाजिक अंतराचे पालन, CCC येथील व्यवस्था इ. बाबत नियमितपणे कार्यवाही करण्यात येत असलेबाबत खात्री करणे.

वरीलप्रमाणे कार्यवाही करुन नियमितपणे जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास अहवाल सादर करणे

           या आदेशाचे उल्लंघन करणारी  व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 व इतर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच या आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून तात्काळ लागू करण्यात येत आहे, असे ही जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी निर्देशित केले आहे.

Post a Comment

0 Comments