जामखेड, खर्डा, भूम-पार्डी फाटा या रस्त्याच्या कामाच्या निविदेत घोळ

जिल्हाधिकाऱ्यानी सा. बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यास 

दिले चौकशीचे निर्देश 




उस्मानाबाद - जामखेड, खर्डा, भूम-पार्डी फाटा या रस्त्याच्या कामाची १४३ कोटीची निविदा रद्द करून फेर निविदा  काढण्यात यावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली होती, त्यावर जिल्हाधिकाऱ्यानी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यास  चौकशी करून अहवाल देण्याचे  निर्देश दिले आहेत. 


 सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी आणि कार्यकारी  अभियंता उमेश झगडे  यांनी तीन पात्र कंत्रादारांना  हेतू पुरस्कर अपात्र ठरवून मर्जीतील दोन कंत्रादाराना टक्केवारी घेऊन निविदा मंजूर केली आहे.


१४३ कोटीची मूळ निविदा असताना, जवळपास १८० कोटी आणि पुढील देखभाल आणि दुरुस्ती करिता ४० कोटी अशी मंजूर करून ९० कोटी रुपयाला चुना लावला आहे. विशेष म्हणजे काळ्या यादीत असलेल्या वॉटर फ्रंट  कन्ट्रक्शनला ही  निविदा मंजूर करण्यात आली आहे.


या संपूर्ण निविदा प्रक्रियेमध्ये मोठा घोळ असून,त्यात अनेकांनी हात धुवून घेतले आहेत. ही  निविदा मंजुरीची राज्याच्या ए.सी.बी.खात्यामार्फत सखोल चौकशी करून चौकशीअंती अधीक्षक अभियंता अनिल कुलकर्णी व कार्यकारी अभियंता उमेश झगडे  तसेच सबंधीत कंत्राटदार यांचेवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम,१९८८ मधील तरतुदी नुसार गुन्हे नोंद करावेत तसेच सदर निविदा तात्काळ रद्द करण्यात येऊन फेरनिविदा मागवण्यात यावी, अशी मागणी सुभेदार जिल्हाधिकाऱ्याकडे  केली होती. 


त्यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यास  चौकशी करून अहवाल देण्याचे  निर्देश दिले आहेत. 


Post a Comment

0 Comments