उस्मानाबाद : विसर्जन विहिरीत पडलेल्या गायीला जीवदान


उस्मानाबाद - पाण्याच्या आशेने विहिरीत उतरण्याच्या प्रयत्नात आतमध्ये पडलेल्या एका मोकाट गायीला पालिकेच्या अग्निशामन दलाने व एका तरुणाच्या प्रयत्नातून विहिरीबाहेर काढून जीवदान देण्यात आले. ही घटना शुक्रवारी (दि.२) दुपारी उस्मानाबाद शहरातील श्री विसर्जन विहिरीत घडली.
उस्मानाबाद शहरातील समतानगर भागात गणपती विसर्जन विहीर आहे. यंदाच्या गणशोत्सवात या विहिरीत पडलेल्या गणेश मूर्ती विसर्जन केल्यानंतर जो गाळ साचला होता, तो क्रेन च्या सहाय्याने काढताना हा विहिरीचा कठडा पूर्णपणे ढासळला होता. त्यामुळेच मुक्या जनावरांचा जीव धोक्यात आला आहे. या संदर्भात उस्मानाबाद लाइव्हने व्हिडीओ वृत्त वृत्त प्रकाशित करून नगरपालिकेला जग आली नाही.
गणेशमूर्ती विसर्जनाच्या श्री विसर्जन विहिरीचे कठडे धोकादायक बनल्यानंतर ते पाडून धोका टाळण्यासाठी कडेने लाकडी बॅरिकेडिंंग करण्यात आलेले आहे. परंतु, एक गाय शुक्रवारी दुपारी पाणी पिण्याच्या प्रयत्नातून आतमध्ये उतरत असताना तोल जाऊन विहिरीत पडली.
याबाबत कांही सुजान नागरिकांनी अग्निशामक दलास माहिती दिल्यानंतर अग्निशामक अधिकारी हेमंत कार्ले व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. यावेळी एका धाडसी तरुणाने वििहरीत उतरून गायीच्या बचावासाठी तिच्या पायाला व पोटाला पट्टा बांधून दिला. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने उचलून सदरील गाय विहिरीबाहेर काढून जीवदान देण्यात आले. या बचाव माेहिमेदरम्यान नागरिकांचाही मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या विहिरीचा धोका टाळण्यासाठी बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे.Post a Comment

0 Comments