पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याचा आ. अभिमन्यू पवार यांचा आरोप लोहारा - तालुक्यातील एका मोठ्या गावातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवय...
पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याचा आ. अभिमन्यू पवार यांचा आरोप
लोहारा - तालुक्यातील एका मोठ्या गावातील दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर चार अल्पवयीन मुलांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीची प्रकृती खालावली असून, उपचारासाठी लातूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी या मुलीवर पाळत ठेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पीडितेची प्रकृती खालावली . तिच्या पालकांनी तिला स्पर्श ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी तिच्या आई - वडिलांनी उलट्या , जुलाब होत असल्याचे सांगितले . परंतु , डॉक्टरांना संशय आल्याने त्यांनी पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली . त्यात तिने चौघांनी अत्याचार केल्याचे सांगितले .
याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाल्यानंतर पीडितेला पुढील उपचार व तपासणीसाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले . याबाबत पोलिस अधीक्षक राजतीलक रोशन यांना संपर्क साधला असता त्यांनी, महिला सपोनी तक्रार नोंदवण्यासाठी गेल्या आहेत, काल देखील त्या गेल्या होत्या मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी एफ आय आर नोंदवली नसल्याचे सांगितले.
या प्रकरणातील चारही आरोपी १६ ते १७ वयोगटातील असल्याचे सांगितले जात आहे.सदरची घटना तीन दिवसांपूर्वी घडली असून, याबाबत अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. या मुलीला लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असून, मुलीची प्रकृती गंभीर आहे.
याप्रकरणी औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांना सदरील घटना कळल्यानंतर त्यांनी लातूर येथील सरकारी रुग्णालयात जाऊन कुटुंबाची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्यामुळे अद्यापही सदरील आरोपींवर कुठलाही गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचा आरोप आमदार अभिमन्यू पवार यांनी केला आहे.
लोहारा - दहा वर्षाच्या मुलीवर चार जणाचा सामुहिक अत्याचार पोलीस गुन्हा दाखल करीत नसल्याचा आ.अभिमन्यू पवार यांचा आरोप https://www.osmanabadtoday.com/2020/10/Lohara-Rape-girl-critical-condition.html
Posted by Osmanabad Live on Tuesday, October 20, 2020
COMMENTS