नळदुर्ग: नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस पुरुष जातीचे अर्भक आढळून आले आहे. अर्भकास बेवारस ...
नळदुर्ग: नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस पुरुष जातीचे अर्भक आढळून आले आहे. अर्भकास बेवारस सोडणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस दि. 28.10.202 रोजी 15.00 वा. सु. त्या अर्भकास उघड्यावर सोडले होते. अशा मजकुराच्या नळदुर्ग पो.ठा. च्या महिला पोलीस- सुवर्णा गिरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 317 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाणीचे दोन गुन्हे दाखल
कळंब: 1)शुभम विकास चव्हाण 2)वर्षा चव्हाण 3)संजय शेंडगे, तीघे रा. पुणे यांनी पुर्वीच्या भांडणाची कुरापत काढून दि. 28.10.2020 रोजी 00.20 वा. सु. भाऊबंद-विकाय लिंबराज चव्हाण, रा. ईटकुर, ता. कळंब यांना त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विकास चव्हाण यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद (श.): अक्षय रमेश गंगावणे, रा. अजिंठानगर, उस्मानाबाद हे दि. 28.10.2020 रोजी 20.30 वा. सु. कोविड सेंटर शासकीय रुग्णालय, उस्मानाबाद येथे आहार पुरवठा करुन रुग्णालय इमारतीतून बाहेर येत होते. यावेळी कोविड सेंटरमध्ये जाऊ न दिल्याच्या कारणावरुन तीन अनोळखी व्यक्तींनी अक्षय गंगावणे यांना कोविड सेंटरच्या प्रवेश द्वाराजवळ गाठून शिवीगाळ करुन चाकुने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अक्षय गंगावणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS