नळदुर्ग: माता न तू वैरिणी अशी एक मराठीत म्हण आहे. अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात महिलेने नुकत्याच जन्मलेल्य...
नळदुर्ग: माता न तू वैरिणी अशी एक मराठीत म्हण आहे. अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात महिलेने नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस टाकून दिले होते. मात्र जेव्हा हे अर्भक सापडले तेव्हा भूकेने रडणाऱ्या बाळास स्वतःच्या अंगावरील दूध पाजून एका महिला कॉन्स्टेबलने मातृत्व धर्म निभावला.
झाले असे की , नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस पिशवीमध्ये पुरुष जातीचे एका अर्भक नळदुर्ग पोलिसांना आढळून आले. जेव्हा हे अर्भक पोलिसांना सापडले तेव्हा ते खूप भुकेने रडत होते. त्याचे रडणे ऐकून एका महिला कॉन्स्टेबलचे मातृत्व जागे झाले आणि स्वतःच्या अंगावरील दूध पाजून त्यास शांत केले. हे अर्भक जखमी अवस्थेत सापडले असून त्याच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. त्यास तातडीने सोलापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल कण्र्यात आले असून, आयसीओ मध्ये हे अर्भक ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी टाळण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्तीने नुकत्याच जन्मलेल्या पुरुष जातीच्या अर्भकास बाभळगांव येथील पुलाखालील रस्त्याच्या बाजूस दि. 28.10.202 रोजी 15.00 वा. सु. त्या अर्भकास उघड्यावर सोडले होते. अशा मजकुराच्या नळदुर्ग पो.ठा. च्या महिला पोलीस- सुवर्णा गिरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 317 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
व्हिडीओ पाहा
COMMENTS