उस्मानाबाद : मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे ठिय्या आंदोलनउस्मानाबाद - संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने बार उघडले आहेत परंतु अनेक वेळा विनंती करूनही महाराष्ट्राची अस्मिता असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास  या सरकारने परवानगी दिलेली नाही. राज्यात बार सुरु आणि मंदिर बंद या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.


राज्यात मागील कित्येक महिने मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून कोरोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. इतर राज्यांमध्ये मंदिरे, प्रार्थनास्थळे चालू आहेत पण केवळ महाराष्ट्रामध्येच बंद का? यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झाली असून लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी  शहराच्या वतीने ग्रामदैवत असलेल्या धारासूर मर्दिनी मंदिरासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.


याप्रसंगी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य सतीश दंडनाईक, जिल्हा सरचिटणीस नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत देवकते, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा शहराध्यक्ष राहुल काकडे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा माधुरीताई गरड, चिटणीस आशाताई लांडगे, मंजुषाताई कोकीळ, विनायक कुलकर्णी, विनोद गपाट, प्रवीण पाठक, वैभव हंचाटे, योगेश जाधव, दाजी अप्पा पवार, बालाजी कोरे, रमण जाधव, अमित कदम, ओम नाईकवाडी, विलास लोंढे, भारत लोंढे, संदीप इंगळे, राज निकम, गिरीश पानसे, राहुल शिंदे, गणेश एडके, विकास चौगुले,  कुलदीप भोसले, प्रीतम मुंडे, दादूस गुंड, निरंजन जगदाळे, शंकर मोरे, सुनील पंगुडवाले, अक्षय कांबळे, पूजा देडे, पूजा राठोड तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


उस्मानाबादसह राज्यातील मंदिरे खुली करा ... उस्मानाबादच्या धारासूर मर्दिनी मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांची ठाकरे सरकार विरुद्ध घोषणाबाजी ....

Posted by Osmanabad Live on Tuesday, October 13, 2020

Post a Comment

0 Comments