उमरगा: थोरलीवाडी, ता. उमरगा येथील 1)नरसप्पा पाटील 2)बालाजी मेकाले 3)रंजित मेकाले 4)संजय मेकाले 5)हनुमंत मेकाले 6)बजरंग मेकाले 7)रायप्पा ...
उमरगा: थोरलीवाडी, ता. उमरगा येथील 1)नरसप्पा पाटील 2)बालाजी मेकाले 3)रंजित मेकाले 4)संजय मेकाले 5)हनुमंत मेकाले 6)बजरंग मेकाले 7)रायप्पा खवडे 8)गोविंद कोराळे 9)गुंडप्पा येंपाळे यांच्या गटाचा गावकरी- 1)रुपचंद कोराळे 2)हरिचंद्र कोराळे 3)फुलचंद कोराळे 4)गोपीचंद कोराळे 5)नागनाथ कोराळे 6)सहदेव कोराळे 7)शिवशंकर कोराळे 8)अविनाथ कोराळे 9)रामदास कोराळे यांच्या गटाशी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन दि. 30.10.2020 रोजी 12.30 वा. सु. थोरलीवाडी येथे वाद झाला. यात दोन्ही गटांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी दि. 30 व 31.10.2020 रोजी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
तामलवाडी: वाणेवाडी, ता. तुळजापूर येथील लक्ष्मण मनोहर वडवे व अशोक माणिक कानगुडे या दोघांत पुर्वीच्या भाडणावरुन व घरासमारुन रहदारीच्या कारणावरुन दि. 30.10.2020 रोजी 17.30 वा. सु. राहत्या गल्लीत वाद झाला. यात नमूद दोघांनी परस्परांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नमूद दोघांनी दि. 31.10.2020 रोजी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन 2 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
COMMENTS