उस्मानाबाद जनता सहकारी बँकेला पुन्हा एकदा हाबडा ...

दुसऱ्यांदा बोलावलेली  सर्वसाधारण सभा रद्द करण्याची संचालक मंडळावर नामुष्की...  
लातुर -  उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला बेकायदेशीरपणे दुसऱ्यांदा बोलावलेली ही सर्वसाधारण बँकेचे सभासद व सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव पनाळे यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा सर्वसाधारण सभा रद्द करण्याची नामुष्की आली.


मराठवाड्यातील नामांकित उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला दुसऱ्यांदा जबरदस्त हाबडा बसला आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर नियमबाह्य कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार व बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी रिझर्व बँकेकडे केली होती. त्याची गंभीर दखल रिझर्व बँकेने घेतली आहे. 


उस्मानाबाद जनता सहकारी बँक ही मराठवाड्यामधील मोठी बँक आसुन या बँकेत सर्वसामान्य जनतेच्या भरपूर ठेवी आहेत. बँकेचे कांही विद्यमान संचालक मागील अनेक वर्षांपासून अत्यंत बेजबाबदारपणे व आरबीआयचे मापदंड पालन न करता केवळ स्वतःच्या स्वार्थाकरिता नियमबाह्य कामे करीत असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते आणि बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्याकडे केली होती. 


संचालक मंडळाची मुदत संपण्याचा कालावधी जवळ आल्यानंतर मागील वर्षभरात स्वतःच्या फायद्याकरिता कर्जदाराची उत्पन्न क्षमता न पाहता लक्षावधी रुपयांचे कर्ज वाटप केले असल्याचे बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी निवेदनाद्वारे रिझर्व बँकेला कळवले होते. 


तसेच बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाल २४ सप्टेंबर २०२० रोजी संपलेला असताना तात्काळ बँकेच्या नवीन संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर न करता व सदरील संचालक मंडळास केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांनी मुदतवाढ दिलेली नसताना सुद्धा कार्यकाळ संपलेल्या संचालक मंडळाने यापूर्वी बोलावलेली सर्वसाधारण सभा माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्री कौस्तुभ दिवेगावकर यांनी रद्द केलेली असताना पुन्हा दुसऱ्यांदा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १८ ऑक्टोंबर २०२० रोजी बोलावली होती. 


केंद्रीय निबंधक सहकारी संस्था दिल्ली यांचे नियम धाब्यावर बसवून नियमांचे पालन न करता ही सर्वसाधारण सभा घाईगर्दीत घेऊन मागच्या आर्थिक वर्षातील नियमबाह्य झालेल्या कामकाजास तसेच आर्थिक व्यवहारास मान्यता घेण्याचा कुटीलडाव संचालक मंडळाने आखला होता. मात्र बँकेचे जागरुक सभासद तथा ज्येष्ठ पत्रकार व्यंकटराव पनाळे यांच्या प्रयत्नामुळे तो कुटीलडाव जो की बँकेच्या हिताच्या दृष्टीने व ठेविदारांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू शकले असते तो डाव हाणून पाडला गेला आहे. बँकेच्या संचालक मंडळास दुसऱ्यांदा बेकायदेशीर बोलावलेली सर्वसाधारण सभा रद्द केल्याची जाहीर सुचना व प्रगटन प्रसिद्ध करण्याची नामुष्की बँकेच्या कार्यकारी संचालकांना घ्यावी लागली आहे.


बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे यांनी दिलेल्या निवेदनाची दखल रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी घेतली आसुन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या बेकायदेशीर कारभाराची सखोल चौकशी करण्याबाबतीत सामाजिक कार्यकर्ते तथा बँकेचे सभासद व्यंकटराव पनाळे  हे जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई व जनरल मॅनेजर रिझर्व बँक ऑफ इंडिया अर्बन बँक विभाग नागपूर यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत.


उस्मानाबाद लाइव्हवरील ताजे अपडेट पाहण्यासाठी उस्मानाबाद लाइव्ह फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा.... 

खालील लिंकवर क्लिक करा... 

https://www.facebook.com/osmanabadlive

Post a Comment

0 Comments