--> वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार | Osmanabad Today

वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार

कायद्याची पदवी नसली तरी कायद्याचा पूर्णपणे अभ्यास असलेले उस्मानाबादचे सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब  सुभेदार यांचा आज वाढदिव...


कायद्याची पदवी नसली तरी कायद्याचा पूर्णपणे अभ्यास असलेले उस्मानाबादचे सुप्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब  सुभेदार यांचा आज वाढदिवस.  वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ  असलेले सुभेदार यांनी, माहितीच्या अधिकारात अनेक प्रकरणे उघडकीस आणून उस्मानाबादच्या भ्रष्ट शासकीय आणि निमशासकीय अधिकाऱ्यांना  सळो  की  पळो करून सोडले आहे. त्यांच्यामुळे अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई झाली आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या  शासकीय कार्यालयात चालणाऱ्या भ्रष्टाचाराला बराच आळा बसला आहे. 


महाराष्ट्रात मराठवाडा आणि मराठवाड्यात उस्मानाबाद जिल्हा सर्वात मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. शहराची लोकसंख्या १ लाख २१ हजार असून एक सुधारित खेडे म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. सतत पडणारा दुष्काळ, दळणवळणाचा अभाव यामुळे उस्मानाबादचा विकास खुंटला आहे. केवळ सरकारी कार्यालय आणि या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शहराची आर्थिक उलाढाल सुरु आहे. त्यांमुळे उस्मानाबादेत सरकारी सुट्टीच्या दिवशी अघोषित संचारबंदी असते.

 

उस्मानाबादच्या एकंदरीत अवस्थेकडे पाहून कोणताही महसूल आणि पोलीस दलाचा मोठा अधिकारी आणि कर्मचारी उस्मानाबाद नको म्हणून सांगतो. इतकेच काय तर उस्मानाबादला येण्यास धजावत नाहीत पण येथे नाइलाजास्तव आल्यानंतर खाबुगिरीची चटक लागल्यानंतर लवकर हालत नाहीत, उलट उस्मानाबाद पाहिजे म्हणून आग्रह धरतात. काही अधिकारी उस्मानाबादेत येवून बरीच माया जमवून गेल्याच्या  रसभरीत कहाण्या  आहेत. माहितीचा अधिकार येण्यापूर्वी सरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार झाकला जात होता. मात्र माहितीचा अधिकार आल्यापासून तो चव्हाट्यावर येवू लागला आहे.


सरकारी कार्यालयात चालणारा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार लोकांना नवा नाही. मात्र माहितीच्या अधिकारात माहिती काढून, त्याचा पाठपुरावा करून अनेक शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई, त्यांना दंड  तसेच सरपंचापासून अनेक पदाधिकाऱ्यांवर न्यायालयात गुन्हे दाखल करण्याचे कुणी काम करत असेल तर सुप्रसिद्ध आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार ! एखाद्या शासकीय कार्यालयात सुभेदार यांचा माहितीच्या अधिकाराखाली अर्ज  आला की शासकीय अधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरते. कारण सुभेदार यांनी एखाद्या  प्रकरणात हात घातला की, शेवटपर्यंत सोडत नाहीत.

 

माहितीच्या अधिकारात एखाद्या प्रकरणात माहिती मिळाली नाही की सुभेदार वरिष्ठांकडे अपील करतात, तेथेही माहिती मिळाली नाही  की राज्य माहिती आयोगाकडे दाद मागतात. तेथे वकील न लावता  स्वतःची बाजू स्वतः मांडतात. माहितीच्या अधिकारातील सर्व कलमे, उपकलमे याचा तोंडपाठ अभ्यास बाळासाहेब सुभेदार यांना आहे. त्यामुळेच त्यांनी अनेक प्रकरणाला वाचा फोडली आहे. सुभेदार यांनी पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी, आरटीओ  आदी अधिकाऱ्यांचाही कथित भ्रष्टाचार, गैरव्यवहार काढून तो चव्हाट्यावर मांडला आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई तसेच दंड करण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे.

 

सुभेदार यांचे मूळ गाव उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर. मात्र सन २०१२ पासून उस्मानाबादेत जाधववाडी रोडलगत असलेल्या छत्रपती संभाजीराजे कॉलनी मध्ये  राहत आहेत.त्यापूर्वी ते शिक्षक कॉलनी मध्ये भाड्याने राहत होते. सध्या त्यांचे वय ३३ असले तरी अनेकांची अक्कल दाडेसह तेहतीशी काढण्याचे काम सुभेदार यांनी केले आहे. सुरुवातीला कपड्यांच्या दुकानात सेल्समन तसेच वृत्तपत्र एजंट म्हणून काम करता करता त्यांना वृत्तपत्र वाचण्याचे वेड लागले. त्यातून संघर्ष करण्याची उर्मी प्राप्त झाली. जाधववाडी रोडवर सुभेदार यांना  त्यांच्या  मामांनी सन २००७ मध्ये एक प्लॉट घेऊन दिला आहे. त्यामध्ये सन २०१२ मध्ये  मामांनीच  त्यांना राहण्यासाठी शेड मारुन दिले परंतु त्यांमध्ये महावितरण कंपनीचे भ्रष्ट अधिकारी विज कनेक्शन देत नव्हते. अनेक हेलपाटे घालूनही महावितरणचे अधिकारी दाद देत नव्हते. त्यामुळे त्यांनी माहितीचा अधिकार अर्जातून  वीज कनेक्शन का देत नाहीत याची माहिती मागितली. त्यातून वरिष्ठाकडे तक्रार केली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दंडाची कारवाई झाली परंतु ती सुभेदार यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर न्यायालयातून गुन्हे दाखल केले. स्वतःवर झालेल्या अन्यायातून दुसऱ्याचा अन्याय दूर करण्याची त्यांना  एक प्रेरणा मिळाली. त्याला जोड मिळाली, माहितीचा अधिकार !

सुभेदार यांनी एखाद्या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई झाली नाही असे कधी घडले नाही. त्यांमुळे गेल्या पाच ते सहा वर्षात किमान दोन ते तीन हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई झाली आहे. मोठमोठ्या  अधिकाऱ्यांची प्रकरणे बाहेर काढत असताना त्यांना  त्रास देण्याचा उद्योग काही भ्रष्ट बड्या अधिकाऱ्यांकडून तर काही गावगुंड प्रवृत्तीच्या राजकीय पुढाऱ्यांकडून झाला मात्र त्याला न डगमगता त्यांनी मोठ्या धाडसाने तोंड दिले. कुणी निंदा अथवा वंदा , माहितीच्या अधिकारात माहिती काढून अधिकाऱ्यांना दंड करणे हाच माझा धंदा असे सुभेदार यांचे अलौकिक कार्य आहे.

 

सुभेदार यांच्या या कार्याची दखल घेऊन पुण्याच्या सजग नागरिक मंच च्या वतीने देण्यात येणारा सजग नागरिक माहिती अधिकार पुरस्कार हरियाणातील आयएएस अधिकारी तथा प्रधान सचिव अशोक खेमका यांच्या हस्ते १ मार्च २०२० रोजी प्रदान करण्यात आला आहे. 

सुभेदार यांच्यामुळे खालील अधिकाऱ्यावर  कारवाई झाली आहे.


*कनिष्ठ लेखाधिकारी पदभरती घोटाळा प्रकरणी  डॉ.प्रशांत भोलानाथ नारनवरे तत्कालीन जिल्हाधिकारी,उस्मानाबाद,सुमन मदणसिंग रावत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद,डॉ.अंकुश रामभाऊ नवले,तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद,शिवानंद कृष्णाथ मिणगिरे तत्कालीन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,उस्मानाबाद,संजय राम गुरव सहाय्यक संचालक,रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद,नंदकिशोर अर्जुनराव कोळगे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, उस्मानाबाद  डी.एन.लोणे प्रकल्प अधिकारी,आदिवासी विकास प्रकल्प,सोलापूर,डॉ.दिपाली बाळासाहेब कांबळे तत्कालीन पशुधन विकास अधिकारी (तां),जिल्हा परिषद, उस्मानाबाद, मुजाहिदीन हुसेन सय्यद तत्कालीन उप अभियंता,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,उस्मानाबाद,राजेंद्र नागोराव साळुंके जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, उस्मानाबाद, शिरीष दत्तात्रय बनसोडे,तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.),जिल्हा परिषद,उस्मानाबाद, के.बी.तावडे वरिष्ठ लेखाधिकारी, जिल्हा परिषद,अर्थ विभाग, उस्मानाबाद,आर.यु.शिंदे सेवानिवृत लेखाधिकारी,जिल्हा परिषद,अर्थ विभाग,उस्मानाबाद,बब्रुवान गुंडाजी बलवंडे सेवानिवृत सहाय्यक लेखाधिकारी,जिल्हा परिषद,अर्थ विभाग,उस्मानाबाद, शरद ए.माळी कनिष्ठ लेखाधिकारी, जिल्हा परिषद,अर्थ विभाग, उस्मानाबाद,डी.एन.शिंदे वरिष्ठ सहाय्यक (ले.),जिल्हा परिषद,अर्थ विभाग,उस्मानाबाद,डॉ.संजय कोलते मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद,अनुप शेंगुलवार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद,सुरेश गंगाधरराव केंद्रे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद,शेंखर शेंटे तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद व सचिन व्यंकटराव कवठे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांचे विरुध्द पोलीस स्टेशन,आनंद नगर, उस्मानाबाद येथे भा.द.वि.कलम १६६,१६६(अ),१६७,१७७,२०१, २०२,२०३,२१७,२१८,४०९,४२०, ४६७,४६८ व ४७१ सह ३४ अन्वये फिर्याद दाखल*


*शिल्पा नरसिंह करमरकर तत्कालीन उप जिल्हाधिकारी (भूसंपादन),मध्यम प्रकल्प क्र.२,उस्मानाबाद यांची विभागीय चोकशी प्रस्तावित*


*मोतिचंद राठोड उप विभागीय पोलीस अधिकारी,उस्मानाबाद यांचे विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे राज्य माहिती आयोग,खंडपीठ औरंगाबाद यांचे आदेश*


*सोनाली तुळशीराम साळुखे तत्कालीन कारकुन,तहसिल कार्यालय,उस्मानाबाद यांचा माहे सप्टेंबर २०१७ पासून घरभाडे भत्ता बंद*


*सुनिता रामचंद्र पाटील तत्कालीन तलाठी,इर्ला यांची एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद*


*बाजीराव पाटील प्राथमिक शाळा,उस्मानाबाद ची मान्यता रध्द*


*न्यु किड्स किगड्म इंग्लिश स्कुल,उस्मानाबाद ची मान्यता रध्द करणेबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक ),जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक),महाराष्ट्र राज्य,पुणे यांच्याकडे पाठविला प्रस्ताव*


*एस.यु.वाकुरे तत्कालीन कार्यकारी अभियंता,सर्व शिक्षा अभियान, जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांनी केलेला शासकीय रक्कमेचा अपहार रक्कम रुपये-१८२६५/- त्यांच्याकडून वसूल करण्यात आली*


*नागेश अनंतराव जोशी सेवानिवृत लिपीक,नगर परिषद,उस्मानाबाद यांच्या दोन वेतन वाढी रोकण्यात आल्या*


*ग्राम पंचायत नमुना ८ अ ला नियमबाह्य नोंद घेतले प्रकरणी दिप्ती दिवाकर कुलकर्णी तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर यांची एक वार्षिक वेतन वाढ थोपवण्यांत आली*


*भास्कर कोल्हे वरिष्ठ सहाय्यक व तानाजी जाधव परिचर,बांधकाम विभाग,जिल्हा परिषद,उस्मानाबाद तसेच पी.आर.बेंद्रे वरिष्ठ सहाय्यक (बांधकाम),जिल्हा परिषद, उपविभाग,कळंब यांना ठपका ही शिक्षा देण्यात आलेली आहे*


*मालन दिलीप सोलनकर तत्कालीन सरपंच,दिप्ती दिवाकर कुलकर्णी तत्कालीन ग्रामसेवक, गणेश नामदेव देशमुख तत्कालीन ग्रामसेवक,ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर व भागवत रामभाऊ ढवळशंख तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी,पंचायत समिती,उस्मानाबाद यांचे विरुध्द पो.स्टे.ढोकी येथे भा.द.वि. कलम- ४०९,४२०,४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल*


*वसंत जनार्धन थेटे सेवानिवृत्त उप अवेक्षक,यशवंत भिमराव डांगे तत्कालीन मुख्याधिकारी,प्रेमनाथ दगडोबा दळवी सेवानिवृत्त लेखापाल,अजय राजाराम चारठाणकर तत्कालीन मुख्याधिकारी,सर्व नगर परिषद,उस्मानाबाद व उदय सदाशिव कुरवलकर तत्कालीन जिल्हा प्रशासन अधिकारी,नगर विकास शाखा,उस्मानाबाद तसेच डी.व्ही.बारबोले ठाणे अंमलदार, पो.स्टे.उस्मानाबाद (शहर) यांचे विरुध्द पो.स्टे. उस्मानाबाद (शहर), येथे भा.द.वि. कलम-४२०,४०९, ४६४,४६७,४६८ सह ३४ अन्वये गुन्हा दाखल*


*रावसाहेब विठ्ठल चकोर तत्कालीन गट विकास अधिकारी,पंचायत समिती,उस्मानाबाद यांचेवर शिस्त भंग विषयक कारवाई प्रस्तावित करणे कामी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी शासनाकडे केले दोषारोप सादर*


*अजिंक्य पवार उप मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,उस्मानाबाद व एस.जी.केंद्रे मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद,उस्मानाबाद यांना सक्त ताकीद देणे व ठपका ठेवणे ही शिक्षा ठोठावणे बाबत जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना निर्देश*


*गणेश माळी तहसिलदार, उस्मानाबाद, सुजित नरहरे, तत्कालीन तहसिलदार, उस्मानाबाद, प्रियंका धोंडीराम लोखंडे नायब तहसिलदार (महसूल), तहसिल कार्यालय, उस्मानाबाद, निलम जगताप लिपिक, तहसिल कार्यालय, उस्मानाबाद व रितू दिलीप बसोले व्यवस्थापकीय संचालक, रुद्राणी इन्फोटेक लि.लातूर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, आनंद नगर, उस्मानाबाद येथे भा.द.वि.कलम ४२०,१६६,१६७,१७७,१९१,१९२, २०१,२०२,२०३ व २१८ सह ३४ अन्वये फिर्याद दाखल*


*विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. दाऊतपूर ता. उस्मानाबाद या संस्थेचे सांप्रतचे संचालक मंडळ महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ७८ (१) मधील तरतुदी नुसार बरखास्त करुन संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी टी.एस. गडकर शाखा तपासणीस, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, शाखा समुद्रवाणी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती*


*मौजे दाऊतपूर रास्त भाव दुकानाची व किरकोळ केरोसीन परवाना संपूर्ण अनामत रक्कम जप्त करुन, परवाना निलंबित केलेला आहे*


*शितल अंगद आकोसकर तलाठी, तलाठी सज्जा, हिंगळजवाडी ता.जि. उस्मानाबाद यांना शासन सेवेतून सेवामुक्त करुन त्यांनी तलाठी पदावर घेतलेले किंवा प्राप्त केलेले इतर कोणतेही लाभ काढून घेऊन शासनाने भत्ता किंवा इतर वित्तीय लाभ यांचे स्वरूपात आकोसकर यांना दिलेली कोणतीही रक्कम संबंधिताकडून जमीन महसूलाच्या थकबाकी प्रमाणे वसूल करणे बाबत उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांचे तहसिलदार, उस्मानाबाद यांना आदेश*


*शितल अंगद आकोसकर तलाठी, तलाठी सज्जा, काजळा व रेशमा बंजरंग पाटील तलाठी, तलाठी सज्जा पाटोदा ता.जि.उस्मानाबाद यांना देय असलेली १ (एक) वार्षिक वेतनवाढ पुढील वेतन वाढीवर परिणाम न होता एक वर्षासाठी तात्पूरत्या स्वरुपात रोखण्यात आलेली आहे*


*उस्मानाबाद जिल्ह्यातील तलाठी मंडळ अधिकारी व इतर महसूल कर्मचारी हे मुख्यालयी राहत नसल्यामुळे त्यांचे माहे जुलै, २०१७ पासून घरभाडे भत्ता बंद केलेला आहे*


*दत्तात्रय विठ्ठल चौरे सेवानिवृत सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी त्यांचे राहत्या घराचे अवैध बांधकाम केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर), येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३(१) अन्वये गुन्हा दाखल*


*निलांबरी मनिष कुलकर्णी अतिरिक्त कार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग, उस्मानाबाद (शहर), व मकरंद मनोहर खडके रा. सांजा रोड, उस्मानाबाद यांनी त्यांचे घराचे अवैध बांधकाम केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर), येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३(१) अन्वये गुन्हा दाखल*


*अमोल जगन्नाथ शिंदे व प्रमोद जगन्नाथ शिंदे (दोघे शिक्षक) यांनी त्यांचे राहत्या घराचे अवैध बांधकाम केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, उस्मानाबाद (शहर), येथे महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ५३ अन्वये गुन्हा दाखल*


*उस्मानाबाद नगर परिषदेने न्यू किड्स किंगडम इंग्लीश स्कूल, उस्मानाबाद या शाळेकरिता क्रिडांगण म्हणून ११००० चौरस फुटाचा ओपन स्पेस देण्यासाठी सभागृहाने मंजूर केलेला ठराव महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३०८ अन्वये तहकुब करण्यात आला आहे*


*मालन दिलीप सोलंकर माजी सरपंच, व दिप्ती दिवाकर कुलकर्णी ग्रामसेवक, ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर ता.जि.उस्मानाबाद यांनी शासनाची फसवणूक करुन, शासकीय रक्कमेचा अपहार केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, ढोकी येथे भा.द.वि. कलम ४०९,४२० सह ३४ अन्वये गुन्हा दाखल*


*मौजे दाऊतपूर ता.जि.उस्मानाबाद येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी मोबाईल कंपनीच्या उभारण्यात आलेल्या मनोरे (टॉवर) यावर कर आकारणी करत नसले प्रकरणी दिप्ती दिवाकर कुलकर्णी तत्कालीन ग्रामसेवक, ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर यांची एक वेतनवाढ पुढील वार्षिक वेतन वाढीवर परिणाम न होता एक वर्षापूर्ती तात्पूरत्या स्वरुपात थोपविण्यात आलेली आहे*


*प्रकाश विश्वनाथ पिंपळे सेवानिवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पंचायत समिती, उस्मानाबाद यांनी कर्तव्यात कसूर केले प्रकरणी त्यांची एक वेतनवाढ पुढील वार्षिक वेतन वाढीवर परिणाम न होता एक वर्षापूर्ती तात्पूरत्या स्वरुपात थोपविण्यात आलेली आहे*


*मालन दिलीप सोलनकर माजी सरपंच व दिप्ती दिवाकर कुलकर्णी व गणेश नामदेव देशमुख तत्कालीन ग्रामसेवक, ग्राम पंचायत कार्यालय, दाऊतपूर ता.जि.उस्मानाबाद तसेच कुंडलिक कैलास गायकवाड शाखा अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी शासकीय कामे निकृष्ट दर्जाचे करुन शासकीय रक्कमेचा गैरवापर करुन शासनाची फसवणूक केले प्रकरणी त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, ढोकी येथे भा.द.वि.कलम ४०९,४०६ व ४२० सह ३४ अन्वये गुन्हा दाखल तसेच सदर प्रकरणी स्वतःच्या पत्नीवर गुन्हा दाखल करता येऊ नये या उद्देशाने पंचायत समिती, उस्मानाबाद मधून फाईल चोरुन नेहणारे उस्मानाबाद पंचायत समितीचे माजी सदस्य दिलीप नामदेव सोलनंकर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन, आनंद नगर, उस्मानाबाद येथे भा.द.वि.कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल*


*संग्राम संजीव काळे व गजानन व्यंकटराव वाघमारे सहाय्यक अभियंता, महावितरण उपविभाग उस्मानाबाद (शहर शाखा क्रमांक २) यांना प्रतेकी रुपये ५०,५००/- (अक्षरी रुपये पन्नास हजार पाचशे मात्र) दंड*


*दत्तात्रय विठ्ठल चौरे तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सेवानिवृत्त सहाय्यक प्रशासन अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना रुपये ६८,०००/- (अक्षरी रुपये आडोसष्ट हजार मात्र) दंड*


*रोहिणी कुंभार तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा उप शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना रुपये ८०००/- (अक्षरी रुपये आठ हजार मात्र) दंड*


*व्ही.जे.राठोड तत्कालीन सहाय्यक जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी, पंचायत समिती, उस्मानाबाद यांना रुपये ५०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) दंड*


*हरिभाऊ रामचंद्र शेगर तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा उप कार्यकारी अभियंता (बांधकाम), जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांना रुपये ५०००/- (अक्षरी रुपये पाच हजार मात्र) दंड*


*मनिषा रामचंद्र कदम तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा रोखपाल, नगर परिषद, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) दंड*


*नागेश अनंतराव जोशी तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा सेवानिवृत्त सभा कामकाज लिपीक, नगर परिषद, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार रुपये मात्र) दंड*


*युनूस सय्यद तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा मोटार वाहन निरिक्षक, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार रुपये मात्र) दंड*


*ए.आर.निबाळकर तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा पोलीस उप निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार रुपये मात्र) दंड*


*नरसिंग जाधव तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा नायब तहसिलदार (पुरवठा), तहसिल कार्यालय, उस्मानाबाद यांना रुपये १०,०००/- (अक्षरी रुपये दहा हजार मात्र) दंड*


*एन.डी.जाधव व एस.एस.सातपुते तत्कालीन जन माहिती अधिकारी तथा  वन परिक्षेत्र अधिकारी, बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांना प्रत्येकी रुपये २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार फक्त) दंड*


COMMENTS

Name

VIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,55,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,92,स्पेशल न्यूज,16,
ltr
item
Osmanabad Today : वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार
वज्रापेक्षा कठोर आणि मेणाहून मऊ - बाळासाहेब सुभेदार
https://1.bp.blogspot.com/-YaVO6N9Ipeg/X4ClY68vxqI/AAAAAAAAiRw/Qw4pFdhevE88hR6zvosEBurfMEcuFXRYACLcBGAsYHQ/s0/subhedar.jpg
https://1.bp.blogspot.com/-YaVO6N9Ipeg/X4ClY68vxqI/AAAAAAAAiRw/Qw4pFdhevE88hR6zvosEBurfMEcuFXRYACLcBGAsYHQ/s72-c/subhedar.jpg
Osmanabad Today
https://www.osmanabadtoday.com/2020/10/Osmanabad-RTI-Balasaheb-Subhedar-Birthday.html
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/2020/10/Osmanabad-RTI-Balasaheb-Subhedar-Birthday.html
true
1604299900197800352
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content