उस्मानाबाद - मला तुमची मुलगी आवडते म्हणुन मी तीला फोन करत असतो. माझ्याशी तीचे लग्न लावून द्या.” असे उर्मटपणाने उत्तर देणाऱ्या एका तरुणाविरुद...
उस्मानाबाद - मला तुमची मुलगी आवडते म्हणुन मी तीला फोन करत असतो. माझ्याशी तीचे लग्न लावून द्या.” असे उर्मटपणाने उत्तर देणाऱ्या एका तरुणाविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका 16 वर्षीय मुलीस ऑनलाईन शिक्षणासाठी तीच्या पालकांनी नुकताच एक स्मार्ट फोन घेउन दिला होता. गावातीलच एका युवकाने तीचा फोन क्रमांक प्राप्त करुन तीला वेळी अवेळी कॉल करुन असभ्य, अश्लील संभाषन करुन त्रास देण्यास सुरवात केल्याने ही हकीकत त्या मुलीने पालकांस सांगीतली. यावर तीच्या पालकांनी दि. 28.10.2020 रोजी त्या युवकास संपर्क साधुन तसे न करण्यास बजावले असता त्या तरुणाने “मला तुमची मुलगी आवडते म्हणुन मी तीला फोन करत असतो. माझ्याशी तीचे लग्न लावून द्या.” असे उर्मटपणाने उत्तर दिले. यावरुन पिडीत मुलीच्या आईने आज दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत युवकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 354 (ए) व (डी), 506 आणि पोक्सो कायदा कलम- 11, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS