उस्मानाबाद (श.): रमेश दासु राठोड, रा. दिपकनगर तांडा, ता. तुळजापूर व त्यांच चुलत भाऊ असे दोघे मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 0604 वरुन दि. 29.10....
उस्मानाबाद (श.): रमेश दासु राठोड, रा. दिपकनगर तांडा, ता. तुळजापूर व त्यांच चुलत भाऊ असे दोघे मो.सा. क्र. एम.एच. 25 एएम 0604 वरुन दि. 29.10.2020 रोजी वडगाव शिवारातील रस्त्याने प्रवास करत होते. दरम्यान एका अज्ञात मोटारसायकल स्वाराने मो.सा. निष्काळजीपणे चालवून रमेश राठोड चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला धडक दिली. या अपघातात रमेश यांच्या पायाचे हाड मोडले तर त्यांचा चुलत भाऊ किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर संबंधीत मो.सा. चालक घटनास्थळावरुन मो.सा. सह पसार झाला. अशा मजकुराच्या रमेश राठोड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी: चालक- भरत रसराम झोडगे यांनी मो.सा. क्र. एम.एच. 23 बीए 7546 ही दि. 28.10.2020 रोजी 18.30 वा. सु. पारगांव येथील मांजरा नदिच्या पुलाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर निष्काळजीपणे चालवून श्रीकृष्ण शिवाजी चाबुकस्वार हे चालवत असलेल्या मोटारसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात श्रीकृष्ण हे जखमी झाले तर त्यांच्या मो.सा. चे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या भरत झोडगे यांनी दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337 आणि मो.वा.का. 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS