उस्मानाबाद : इन्स्टा कार्ट सर्विसेस प्रा.लि. यांचे पार्सल कार्यालय तावडे कॉम्प्लेक्स, उस्मानाबाद येथे असुन ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केलेल्...
उस्मानाबाद : इन्स्टा कार्ट सर्विसेस प्रा.लि. यांचे पार्सल कार्यालय तावडे कॉम्प्लेक्स, उस्मानाबाद येथे असुन ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तु या कार्यालया मार्फत वितरीत केल्या जातात. या कार्यालयात कार्यरत असणारे डिलीव्हरी कर्मचारी- 1)सत्यजित बनसोडे, उस्मानाबाद 2)अभिजीत तेरकर, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद यांनी संगणमत करुन दि. 10.07.2020 ते 28.10.2020 या कालावधीत ग्राहकांना वितरीत करण्याकरीता आलेले मोबाईल फोन, घड्याळ, बुट, बेडशीट, हेडफोन, ट्रॅकसुट, लॅपटॉप टेबल, खाद्य तेल, कंबरपट्टे इत्यादी साहित्य असलेले 3,25,550 ₹ चे पार्सल चोरुन नेले. अशा मजकुराच्या इम्रान अत्तार, रा. पुणे यांनी आज दि. 30.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 381, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद - सविता धनंजय यादव, रा. बँक कॉलनी, श्रीनगरी, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 29.10.2020 रोजी दुपारी 03.00 वा. सु. तोडून घरातील 5,000 ₹ चोरुन नेले आहेत. अशा मजकुराच्या सविता यादव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी: सुर्यकांत मच्छिंद्र चेडे, रा. सारोळा (वाशी), ता. वाशी यांच्या सारोळा (वाशी) येथील शेतात बांधलेल्या 5 म्हशी 1)श्रीराम ज्ञानोबा विधाते 2)मिराबाई विधाते 3)अक्षय विधाते 4)शुभम विधाते, सर्व रा. कवडेवाडी, ता. वाशी यांनी दि. 08.10.2020 रोजी 18.00 वा. सु. चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या सुर्यकांत चेडे यांनी दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम - भाऊसाहेब बाबुराव तळेकर, रा. हाडोंग्री, ता. भुम हे दि. 07 ते 08.10.2020 रोजी या कालावधीत बाहेरगावी गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने तोडून आतील 6.5 ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, कपडे व एक चार्जिंग बॅटरी असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या भाऊसाहेब तळेकर यांनी दि. 29.10.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS