उस्मानाबाद - जिल्ह्यातील सास्तूर (ता. लोहारा) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याब...
उस्मानाबाद - जिल्ह्यातील सास्तूर (ता. लोहारा) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणात हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याबरोबरच याप्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्याबाबत मागणी करणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी (दि.२३) आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिस अधीक्षक रौशन म्हणाले की,“या अपराधाची रितसर प्रथम खबर (FIR) घेण्यात आली असुन गुन्हा करणारे 3 अल्पवयीन मुले (विधीसंघर्ष ग्रस्त बालके) यांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांना बालन्याय मंडळासमोर सादर केले जाणार आहे. झालेला अत्याचार ही निंदनीय घटना असुन उस्मानाबाद पोलीस पिडीत मुलगी व तीच्या कुटूंबीयांस सहानुभूतीपुर्वक सर्वतोपरी मदत करत असुन पिडीत मुलीच्या कुटूंबीयांना अडचण येउ नये म्हणुन उस्मानाबाद पोलीस दलातील साध्या वेशातील अधिकारी- कर्मचारी त्यांच्या समवेत दिलेले आहेत.
आपण स्वत: पिडीत मुलीच्या व तीच्यावर वैद्यकीय उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारऱ्यांच्या सतत संपर्कात राहुन तीला योग्य वैद्यकीय उपचार मिळतील याची खात्री करत असुन पिडीत मुलीची प्रकृती आता सुधारत आहे.पिडीत मुलीस आर्थिक सहाय्य मिळावे याकरीता जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद यांना त्वरीत प्रस्ताव सादर करण्यात आला असुन पिडीत मुलगी व तीच्या कुटूंबीयांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार उस्मानाबाद पोलीस दलाने केला आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी- उमरगा, श्रीमती अनुराधा उदमले या करत असुन सबळ पुरावे गोळा करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्याचा व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करणार आहे.”
तसेच पीडितेच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी पोलिस अधिकारी त्यांच्या सोबत असून कायदेशीर मदतीसह उपचारातही कोणती अडचण होऊ नये याकरीता उस्मानाबाद पोलिस दल प्राधान्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. तसेच सध्या पीडित मुलगी शुद्धीवर आली असून, तिच्या प्रकृतीतही सुधारणा होत आहे. पीडितेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्यासाठीचा प्रस्तावही पोलिस दलाने जिल्हा विधी व सेवा प्राधीकरणाला सादर केला आहे. तसेच याप्रकरणातील तीनही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन बालविधी संघर्ष न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दि. २९ ऑक्टोबरपर्यंत रिमांड होममध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले या तपास करत असून सबळ पुरावे गोळा करून लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाईल. तसेच याप्रकरणात पीडितेची बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती व्हावी तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा यासाठीही पोलिस दलाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी एसपी राज तिलक रौशन यांनी सांगितले.
COMMENTS