उस्मानाबाद - पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी तरुणांनी एका व्यक्तीस हातोहात ३० ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली. उस्मानाबाद शहरात असे प...
उस्मानाबाद - पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी तरुणांनी एका व्यक्तीस हातोहात ३० ग्रॅम सोन्याची अंगठी लंपास केली. उस्मानाबाद शहरात असे प्रकार वारंवार घडत असताना, पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत.
घडले असे की , बाबूराव महादेव क्षीरसागर, वय 68 वर्षे, रा. उंबरे कोठा, उस्मानाबाद हे आज दि. 31.10.2020 रोजी 09.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील निरज गॅस कार्यालयासमोरील रस्त्याने जात होते. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या 2 अनोळखी पुरुषांनी बाबूराव क्षीरसागर यांना थांबवले. त्या दोघांनी आपण पोलीस असल्याची बतावणी करुन बाबूराव क्षीरसागर यांना अंगावरील दागिने काढून रुमालात बांधून ठेवण्यास सांगीतले. यावर क्षीरसागर यांनी हातातील 30 ग्रॅम सोन्याची अंगठी काढून रुमालात बांधत असतांना त्या दोघा पुरुषांनी हातचलाखीने रुमालात बांधलेली अंगठी काढून घेतली. थोडया अंतरावर गेल्यानंतर बाबूराव क्षीरसागर यांना संशय आल्याने त्यांनी खात्री केली असता रुमालातील ती अंगठी आढळली नाही. अशा मजकुराच्या बाबूराव क्षीरसागर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 170, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS