उस्मानाबाद - शासन एकीकडे निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम राबवित आहे. त्यासाठी खर्च दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च ...
उस्मानाबाद - शासन एकीकडे निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवड मोहीम राबवित आहे. त्यासाठी खर्च दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे तर दुसरीकडे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या शासकीय निवासस्थान परिसरात असलेल्या वृक्षांची कत्तल करण्यात आली. ती देखील विना परवाना केली असून त्याची वृक्ष वन विभागाला साधी कल्पना देखील दिलेली नाही.
दरवर्षी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदण्यापासून वृक्षांची रोपे विकत घेऊन ती लावण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाते. तसेच लावलेल्या वृक्षांची व्यवस्थितपणे जोपासा करण्यासाठी व्यवस्था केली जाते. मात्र निवासस्थानी असलेली मोठ-मोठी वृक्ष तोडून नेमका कोणता संदेश जिल्हा परिषदेने वृक्षप्रेमींना दिला आहे , असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे या निवासस्थानी उपाध्यक्ष सावंत हे कधीतरीच राहत असले तरी ते सतत बाहेरगावी असल्यामुळे हे निवासस्थान देखील बंदच असते. त्यामुळे वृक्षांची करण्यात आलेली कत्तल त्यांना तरी माहित आहे का नाही की ते देखील यापासून अनभिज्ञच आहेत.
निवासस्थानी असलेली मोठमोठी वृक्ष तोडली सल्यामुळे या निवासस्थानाची शोभा गेली असून ते विद्रूप दिसू लागले आहे. त्यामुळे त्या निवासस्थानास विद्रूप करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर जिल्हा परिषद कारवाई करणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
COMMENTS