ढोकी: अमोल दिलीप फंड, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे दि. 31.10.2020 रोजी 18.00 वा. सु. तेर येथील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी भाऊबंद- 1)सुन...
ढोकी: अमोल दिलीप फंड, रा. तेर, ता. उस्मानाबाद हे दि. 31.10.2020 रोजी 18.00 वा. सु. तेर येथील आपल्या शेतात काम करत होते. यावेळी भाऊबंद- 1)सुनिल शहाजी फंड 2)ओम फंड 3)रघुनाथ फंड या तीघांनी तेथे यउन शेतीच्या पुर्वीच्या भांडणावरुन अमोल फंड यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन, अमोल यांच्या हातास चावा घेउन जखमी केले. अशा मजकुराच्या अमोल फंड यांनी दि. 02.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी: शहाजी राजेंद्र जाधव, रा. महाळंगी, ता. उस्मानाबाद हे आज दि. 03.11.2020 रोजी 10.30 वा. सु. महाळंगी येथील आपल्या शेतात विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतातील सामाईक पाईपलाईनच्या आर्थिक व्यवहारावरुन भाऊ- शिवाजी जाधव व धिरज शिवाजी जाधव या दोघा पिता- पुत्रांनी शहाजी जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, स्टार्टरने डोक्यात मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या शहाजी जाधव यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अपघात
उमरगा: चालक- राम रंगन्ना मंडले, रा. खंडाळा, ता. आळंद, जि. गुलबर्गा यांनी जीप वाहन क्र. एम.एच. 12 वायए 5448 ही दि. 30.10.2020 रोजी नागराळ येथे असलेल्या तलावाजवळील रस्त्यावर निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवून सायकलने प्रवास करत असलेल्या विनायक श्रीमंत गायकवाड, रा. नागराळ, ता. उमरगा यांना समोरुन धडक दिली. या अपघातात विनायक गायकवाड हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या विनायक गायकवाड यांनी दि. 02.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS