उस्मानाबाद - “माझे नाव अशोक माने असुन मी समाज कल्याण अधिकारी आहे. मी तुम्हाला समाज कल्याण खात्याच्या अपंग कल्याण योजनेतून निधी मिळवून देत...
उस्मानाबाद - “माझे नाव अशोक माने असुन मी समाज कल्याण अधिकारी आहे. मी तुम्हाला समाज कल्याण खात्याच्या अपंग कल्याण योजनेतून निधी मिळवून देतो.” अशी बतावणी करणाऱ्या एका अज्ञाताने रतन किसन चव्हाण, रा. शास्त्रीनगर तांडा, दाळींब, ता. उमरगा यांना दि. 01.11.2020 रोजी 16.10 वा. सु. उस्मानाबाद येथील बेंबळी टी जंक्शनजवळ बोलावून घेतले. यावेळी रतन चव्हाण यांनी त्याने मागीतल्या प्रमाणे 50,000 ₹, आधार कार्ड, बँकपासबुकची छायांकीत प्रत त्यास दिली. अशा मजकुराच्या रतन चव्हाण यांनी आज दि. 03.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 419 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
सुनेचा छळ, गुन्हा दाखल
लोहारा: वैष्णवी मनोज जोरी, रा. कास्ती (बु.), ता. लोहारा यांनी माहेरहुन पैसे आणावेत असा तगादा सासरकडील 1)मनोज नथु जोरी (पती) 2)निर्मला (सासु) 3)दत्ता (दिर) 4)निरंजन (दिर) 5)सुनीता जोरी (जाऊ) 6)कला जोरी (जाऊ), सर्व रा. कर्वेनगर, पुणे यांनी लावला होता. त्यासाठी त्यांनी संगणमताने वैष्णवी यांचा सन- 2018 पासुन सासरी कर्वेनगर, पुणे येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ केला. अशा मजकुराच्या वैष्णवी जोरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद आरोपींविरुध्द भा.दं.सं. कलम- 498 (अ), 323, 504, 506, 34
COMMENTS