नळदुर्ग: आरोग्य सहायक- सतीश रंगनाथ कोळगे हे दि. 02.11.2020 रोजी 16.00 वा. सलगरा (दि.) येथील प्रा. आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होते. यावेळी ति...
नळदुर्ग: आरोग्य सहायक- सतीश रंगनाथ कोळगे हे दि. 02.11.2020 रोजी 16.00 वा. सलगरा (दि.) येथील प्रा. आरोग्य केंद्रात कर्तव्यावर होते. यावेळी तिरुपती धनाजी लोमटे, रा. सलगरा (दि.), ता. तुळजापूर यांनी आरोग्य केंद्रात येउन, “तु काय काम करतो, तु जास्त माजलास.” असे सतीश कोळगे यांना उर्मटपणाची भाषा वापरून त्यांना शिवीगाळ करुन गचांडी पकडून धक्काबुक्की केली. अशा प्रकारे तिरुपती लोमटे यांनी लोकसेवकाच्या कर्तव्यात जाणीवपुर्वक अडथळा निर्माण केला. यावरुन सतीश कोळगे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 332, 504, 506 सह महाराष्ट्र वैद्यकीय आणि व्यक्ती सेवा संस्था कायदा कलम- 3, 4 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
जुगार विरोधी कारवाई
कळंब: 1)ताहीर शब्बीर शेख 2)विकास नागनाथ मदणे, दोघे रा. कळंब हे दि. 02.11.2020 रोजी होळकर चौक, कळंब येथे चक्री जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 11,660/-रु. बाळगले असतांना पो.ठा. कळंब च्या पथकास आढळले. यावरुन नमूद आरोपींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
अवैध मद्य विरोधी कारवाई
लोहारा सचिन दत्तु हाके, रा. रा. करवंजी, ता. लोहारा हा दि. 02.11.2020 रोजी गावातील जि.प. शाळेसमोर 180 मि.ली. देशी दारुच्या 26 बाटल्या (किं.अं. 1,690/-रु.) विनापरवाना बाळगला असतांना पो.ठा. लोहारा च्या पथकास आढळला. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्तकरुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS