--> कळंब शहरात वाहतुकीची कोंडी | Osmanabad Today

कळंब शहरात वाहतुकीची कोंडी

वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर  कळंब ( विशाल कुंभार ) -  कळंब शहरात वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आ...

वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर 


कळंब ( विशाल कुंभार ) -  कळंब शहरात वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. खरेदीसाठी आलेले लोक चक्क रत्यावर वाहन लावत असून, यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे तर अनेकजण रत्यावर कचरा फेकत असलेल्या कचऱ्याचे ढीग साचत आहेत. 




सत्तेत येण्यापूर्वी नागरिकांना मोठे मोठे आश्वासन देण्यात येते मात्र सत्तेत आल्यानंतर शहरातील विकास कामांना व नागरिक व्यापारी यांच्या अडचणी लक्षात घेत नसल्याचं दिसून येत असून कळंब शहरातील वाहन पार्किंग व स्वच्छतेचा प्रश्न मिटत नसल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.


कळंब शहरात गेल्या अनेक वर्षांपासून व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर लागणाऱ्या दुचाकी गाड्या व वाहन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगर परिषद प्रशासन अमसर्थ दिसत आहे.शहरात दुचाकी वाहनाला पार्किंगचे नियोजन नसल्याने शहरात येणारे वाहनधारक हे कुठेही गाडी लावतात आणि खरेदी करतात याचा नाहक त्रास व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे.नगर परिषद प्रशासनाने सम विषम तारखेप्रमाणे गाडी पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.


कळंब शहरात मोठी बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातील नागरिक खरेदी करण्यासाठी येतात.व्यापाऱ्यांच्या दुकाना समोर दुचाकी गाडी पार्किंग असल्याने व्यापाऱ्यांचा व्यवसाय होत नाही.नगर परिषद प्रशासनाला वारंवार मागणी करुन सुद्धा दुचाकी पार्किंग चा प्रश्न मार्गी लागत नाही.



नगर परिषदचे मुख्यधिकारी यांना पार्किंगच्या विषयावर प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ नसल्याने कळंब शहरातील व्यवसायकाना दुचाकी पार्कींग चा त्रास सहन करावा लागणार आहे असे दिसत आहेत तर निवडणुकीच्या वेळी आश्वासन देऊन निवडून आलेले प्रतिनिधी तरी व्यापाऱ्यांच्या  मदतीला येणार का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.



मेन रोडवरील बेकायदेशीर पार्किंग मुळे व्यवसाय करण्यास अडचण निर्माण होत आहे.यासाठी नगरपरिषदेने सम-विषम पार्किंग सुरू केले पाहिजे.


ऊस व जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कळंबची ओळख आहे ते नावलौकिक व्यापारी वर्गाने कायम ठेवले आहे आता गरज आहे नगर परिषद व्यापारीवर्गाला सहकार्य करण्याची यासाठी  नक्कीच नगरपरिषद पुढाकार घेईल अशी आशा आहे -हर्षद अंबुरे. व्यापारी कळंब

COMMENTS

Name

VIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,92,उस्मानाबाद शहर,24,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,8,ताज्या बातम्या,13,देश - विदेश,3,महाराष्ट्र,19,मुख्य बातमी,86,स्पेशल न्यूज,14,
ltr
item
Osmanabad Today : कळंब शहरात वाहतुकीची कोंडी
कळंब शहरात वाहतुकीची कोंडी
https://1.bp.blogspot.com/-nKf82CugZIE/X7iyXeazS1I/AAAAAAAAKnE/jY_cAWXQPRc7EZS_Iz7xSejAkVIFx2szwCLcBGAsYHQ/s320/as.jpg
https://1.bp.blogspot.com/-nKf82CugZIE/X7iyXeazS1I/AAAAAAAAKnE/jY_cAWXQPRc7EZS_Iz7xSejAkVIFx2szwCLcBGAsYHQ/s72-c/as.jpg
Osmanabad Today
https://www.osmanabadtoday.com/2020/11/Kalamb-parking-problem.html
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/2020/11/Kalamb-parking-problem.html
true
1604299900197800352
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content