मुंबई - साथीविरुद्ध लस काढणारी फायजर इंकनंतरची मॉडर्ना ही दुसरी अमेरिकेची कंपनी ठरली आहे. या फार्मास्युटिक कंपनीच्या दाव्यानुसार, तिची लस ९...
मुंबई - साथीविरुद्ध लस काढणारी फायजर इंकनंतरची मॉडर्ना ही दुसरी अमेरिकेची कंपनी ठरली आहे. या फार्मास्युटिक कंपनीच्या दाव्यानुसार, तिची लस ९४.५ टक्के प्रभावी आहे. लसीच्या आनंदामुळे सोन्याच्या आकर्षणात अडथळे निर्माण झाल्याने मंगळवारी स्पॉट गोल्डचे दर ०.५२ टक्क्यांनी घसरले व ते प्रति औस १८७८.६ डॉलर किंमतीवर बंद झाले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
मॉडर्ना लसीच्या प्रभावामुळे गुंतवणूकदार पिवळ्या धातूपासून दुरावले. तथापि, कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पिवळ्या धातूतील नुकसानीला मर्यादा आल्या. तसेच डॉलरचे अवमूल्यन झाल्याने जोखिमीची भूक कमी झाली. यासोबतच, जागतिक मध्यवर्ती बँका येत्या काही महिन्यांत साथपूर्व स्थितीत अर्थव्यवस्थेला नेण्याकरिता मदतीची भूमिका कायम ठेवतील. त्यामुळे नजीकच्या काळात सोन्याला आधार मिळेल.
COMMENTS