उस्मानाबाद - समीर ठक्कर या युवकाने राज्य सरकारच्या कारभारावर टिपणी करणारे ट्विट केले ,त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्या...
उस्मानाबाद - समीर ठक्कर या युवकाने राज्य सरकारच्या कारभारावर टिपणी करणारे ट्विट केले ,त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. हा सरळ युवकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारने घाला घातला आहे. सरकारच्या या कृतीचा आपण जाहीर निषेध करत असल्याचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारच्या कारभारावर विरोध करणारा युवक समीर ठक्कर यांना सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देणाऱ्या राज्य सरकार विरोधात भाजयुमो च्या वतीने निषेध नोंदवण्यात आलेला आहे.समीर ठक्कर च्या वक्तव्याला आमचे समर्थन नाही परंतु त्याला दोषी ठरवण्याचा निर्णय न्यायालयला आहे. पण ज्याप्रकारे त्याला न्यायालयात नेताना एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे अतिरेकी या प्रमाणे वागणूक देण्यात आली ते अतिशय चुकीचे आणि निंदनीय आहे.तसेच या तिघाडी सरकारची ही कृती युवा वर्गांमध्ये चीड आणणारी असल्याची आहे.
यावेळी शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,तालुकाध्यक्ष गजानन नलावडे,सुजित साळुंके,मारुती रोकडे,सचिन लोंढे,राहुल शिंदे, हिम्मत भोसले,गणेश एडके, मनोजसिंह ठाकुर, निरंजन जगदाळे, संकेत हरवले,विठ्ठल माळी,कुलदीप भोसले, गणेश इंगळगी, बाबू जाधव ,अक्षय विंचूरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS