--> पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज | Osmanabad Today

पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज

मतदारांनी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यास प्रशासनास सहकार्य करावे -  जिल्‍हाधिकारी उसमानाबाद -  महाराष्‍ट्र विधान परिषद व्दिवार्षीक निवडणू...

मतदारांनी निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यास प्रशासनास सहकार्य करावे -  जिल्‍हाधिकारी




उसमानाबाद -  महाराष्‍ट्र विधान परिषद व्दिवार्षीक निवडणूक 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने ज्‍यारी केलेल्‍या कार्यक्रमानुसार दिनांक 01डिसेंबर2020 रोजी सकाळी 08.00 ते सांयकाळी 5.00 वाजे पर्यंत उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील एकुण 74 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.  त्‍या अनुषंगाने जिल्‍हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस बंदोबस्‍त आणि कोविड-19 च्‍या पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारची पूर्व तयारी व प्रतिबंधात्‍मक उपाय योजना करण्‍यात आलेल्‍या आहेत.


प्रत्‍येक मतदान केंद्रासाठी 4 पोलीस कर्मचारी/होमगार्डस् यांची नियुक्ती करण्यात आलेली असून एक पेक्षा जास्‍त मतदान केंद्र असलेल्‍या इमारतीसाठी अतिरीक्‍त पोलीस कुमक बंदोबस्तात राहणार तसेच 30नोव्हेंबर  व 1 डिसेंबर या रोजी विशेष पोलीस सेक्‍टर पेट्रोलींग चे नियोजन करण्यात आले आहे. मतदान केंद्रा पासून 100 मि. व 200 मि. वर चूना फक्‍कीने मार्कींग करण्यात आली आहे या हद्द‍िमध्‍ये प्रचार करण्‍यास निर्बंध आणिमतदान केंद्रावर मोबाईल /कॅमेरा इत्‍यादी इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तूंना मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत  . 29नोव्हेंबरच्‍या सांयकाळी 5 पासून 1 डिसेंबरच्या सायंकाळी 5. वाजेपर्यंत संपूर्ण उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात मद्य विक्री अनुज्ञप्‍त्या बंध ठेवण्‍याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. जिल्‍हयाच्‍या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर जिल्‍हाधिकारी कार्यालयातील Control Room मधून सनियंत्रण ठेवण्यात येणार .सर्व मतदान केंद्राच्‍या Web Casting ची निरिक्षण व नियंत्रण ,निवडणूक प्रक्रिये दरम्‍यान वापरणात येणा-या सर्व वाहनांचे GPS Tracking ,निवडणूक विषयक सर्व अहवाल संकलन यंत्रणा कार्यन्‍वीत असेल. तसेच जिल्‍हास्‍तरीय कंट्रोल रुम मधून सर्व 74 मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवला जाईल व मतदान केंद्रावर डीओग्राफरची नेमणूक व पूर्ण मतदान प्रक्रीयेची Live Webcasting केली जाणार. मतदान पथकाची मतपेटयासह वाहतूक करणा-या 74 वाहनांची आणि 27 क्षेत्रिय अधिकारी यांचे वाहनांची जिल्‍हास्‍तरावरील Control Room मधून GPS Tracking केले जाईल. तसेच सर्व  मतदान केंद्रासाठी  मतदार सहाय्यता कक्ष  BLO (मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी) नेमणूक करण्यात आली असून मतदारांना मतदार यादीतील नावाची पडताळणी करण्‍यात मदत करतील.


Ø  जांभळ्या पेननेच मतदान :भारत निवडणूक आयोगाने पुरविलेले जांभळ्या शाईच्‍या स्‍केच पेननेच पंसतीक्रम नोदवून मतदान करणे आवश्‍यक. इतर पेनचा वापर केल्‍यास असे मत अवैद्य ठरू शकते. 


एक दिवसाची नै‍मत्तिक रजा : मतदान दिवस  दिनांक 01/12/2020 रोजी पदवीधर मतदानासाठी एक दिवसाच्‍या नैमत्तिक रजेचे प्रयोजन 


COVID प्रतिबंधा‍त्‍मक दक्षता


प्रत्‍येक मतदान केंद्र मतदानाच्‍या एक दिवस पुर्वी  सॅनिटाईज करणार ,शारिरीक अंतर पाळण्‍यासाठी 2 मिटर अंतराचे मार्कींग ,मतदान पथकासाठी कोविड किट( मास्‍क, ग्‍लोज, सॅनिटायझर, फेसशिल्‍ड इ.)  उपलब्‍ध करुन देणार ,प्रत्‍येक मतदान केंद्रावर आरोग्‍य पथक प्रत्‍येक मतदाराचे थर्मलगन व्‍दारे तपासणी करणार.


मतदारांना मास्‍क वापरणे बंधनकारक असून मतदान पथके व मतदारांसाठी पुरेशा प्रमाणात मास्‍क उपलब्‍ध करुन दिले जातील.


ओळखीचे पूरावे आवश्‍यक :भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार मतदान ओळखपत्रा व्‍यतीरिक्‍त इतर ग्राह्य ओळखीचे पुरावे पुढील प्रमाणे.


 I.            आधार कार्ड (Aadhaar Card)


 II.            वाहन चालक परवाना (Driving License)


  IV.            पारपत्र (Passport)


V.            केंद्र/राज्‍य शासन/ सार्व‍जनिक उपक्रम/ स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था किंवा खाजगी औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र (Service identity Cards with photograph issued to employees by central/State Govt. IPSUs/ Local Bodies or other private industrial Houses) 


 VI.            मा. खासदार /मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र (Official identity cards issued to MPs/MLs IMLCs)


 VII.            संबंधित पदवीधर/शिक्षण मतदार संघातील शिक्षण संस्‍थेत कार्यरत असलेल्‍या पदवीधर/शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र (Service identity Card issued by the educational institutions in which the lectors of the concerned Teachers/ Diploma issued by University, may by employed)


  VIII.            विश्‍वविद्यालयाव्‍दारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र (Certificate of degree/ Diploma issued by University, in original)


   IX.            सक्षम प्राधिकरणाव्‍दारे वितरीत केलेले अपंगत्‍वाचे मुळ प्रमाणापत्र (Certificate of physical handicap issued by competent Authority in original)


जिल्‍हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. पोलीस बंदोबस्‍त आणि कोविड-19 च्‍या पार्श्‍वभूमीवर सर्व प्रकारची पूर्व तयारी व प्रतिबंधात्‍मक उपाय योजना करण्‍यात आलेल्‍या आहेत त्यामुळे मतदारांनी कुठलीही काळजी न करता परंतू शासनाने व आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर करून ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यास प्रशासनास सहकार्य करा असे आवाहन जिल्‍हाधिकारी उस्‍मानाबाद तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ कौस्‍तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.

COMMENTS

Name

VIDEO,4,उस्मानाबाद जिल्हा,127,उस्मानाबाद शहर,30,एडिटर डेस्क,2,खुले व्यासपीठ,9,ताज्या बातम्या,53,देश - विदेश,3,महाराष्ट्र,20,मुख्य बातमी,91,स्पेशल न्यूज,15,
ltr
item
Osmanabad Today : पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज
पदवीधर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज
https://1.bp.blogspot.com/-pbO_27cpBio/X8JT02TlzFI/AAAAAAAAjYw/zl6cJD_yYk0-n3UoVyqOjZFtcTZ65rvlACLcBGAsYHQ/s320/%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580%2B%25E0%25A4%2595%25E0%25A5%258C%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2581%25E0%25A4%25AD%2B%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%2597%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%2B%25281%2529.jpg
https://1.bp.blogspot.com/-pbO_27cpBio/X8JT02TlzFI/AAAAAAAAjYw/zl6cJD_yYk0-n3UoVyqOjZFtcTZ65rvlACLcBGAsYHQ/s72-c/%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B2%25E0%25A5%258D%25E0%25A4%25B9%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25A7%25E0%25A4%25BF%25E0%25A4%2595%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B0%25E0%25A5%2580%2B%25E0%25A4%2595%25E0%25A5%258C%25E0%25A4%25B8%25E0%25A5%258D%25E0%25A4%25A4%25E0%25A5%2581%25E0%25A4%25AD%2B%25E0%25A4%25A6%25E0%25A4%25BF%25E0%25A4%25B5%25E0%25A5%2587%25E0%25A4%2597%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B5%25E0%25A4%2595%25E0%25A4%25B0%2B%25281%2529.jpg
Osmanabad Today
https://www.osmanabadtoday.com/2020/11/Osmanabad-Collector-Kaustrutubh-Divegavkar.html
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/
https://www.osmanabadtoday.com/2020/11/Osmanabad-Collector-Kaustrutubh-Divegavkar.html
true
1604299900197800352
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content