ढोकी- नितीन घेवारे रा.वाणेवाडी ता .उस्मानाबाद हे दि .२७ / ११ / २०२० रोजी १९ .०० वाजता गाव शिवारातील आपल्या शेतातुन घराकडे मो.सा.ने जात होते...
ढोकी- नितीन घेवारे रा.वाणेवाडी ता .उस्मानाबाद हे दि .२७ / ११ / २०२० रोजी १९ .०० वाजता गाव शिवारातील आपल्या शेतातुन घराकडे मो.सा.ने जात होते.यावेळी गावातील प्रदीप , धीरज , मनिषा घेवारे कुटुंबीयांनी व रामलिंग केसकर यांनी त्यांची मोटार सायकल अडवुन थांबवले . यावेळी नमुद सर्वांनी जुन्या वादाच्या कारणा वरून नितीन यांना शिवीगाळ करून लाथाबुक्याने , काठीने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली . अशा मजकुराच्या नितीन घेवारे यांनी दि .२९ / ११ / २०२० रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरून भा.दं. सं.कलम ३४१,३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४ ९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे .
उमरगा- फुलचंद यंपाळे व हणुमंत यंपाळे श.थोरलीवाडी ता . उमरगा या दोघा भावाचा राहुल राठोड रा.पळसगांव ता.उमरगा याच्यासह ०५ जनांच्या गटाशी दि . २८/११/२०२० रोजी १६.५० वाजता उमरगा येथील बस स्थानकात जुना वाद उफाळुन आला . यावेळी दोन्ही गट परस्पर गटास शिवीगाळ करून झुंज मारामा - या करत असतांना उमरगा पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले . यावरून पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरून भा.दं.सं.कलम १६० अन्वये गुन्हा नोंदवला आहे .
COMMENTS