स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दगुभाई शेख यांची पोलीस कल्याण विभागला बदली उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक, स...
स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दगुभाई शेख यांची पोलीस कल्याण विभागला बदली
उस्मानाबाद - उस्मानाबाद पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत तसेच काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हा बाहेर बदल्या झाल्या आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख यांची पोलीस कल्याण विभाग तर गजानन घाडगे यांची स्थानिक गुन्हे शाखा, पो.नि. मनोजकुमार राठोड यांची तुळजापूर पोलीस स्टेशन, पो.नि. श्रीमती अर्चना पाटील यांची सायबर पोलीस स्टेशन,पो.नि सुनील गिड्डे यांची परंडा, पो.नि. मुकुंद आघाव यांची उमरगा येथे बदली करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दगुभाई शेख हे पोलीस अधीक्षकांचे 'खास' पोलीस निरीक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांची पोलीस कल्याण विभागला बदली झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जिल्ह्याबाहेर बदली
पो.नि. साईनाथ ठोबरे यांची बीड, पो.नि. सुरेश चाटे यांची बीड, पो.नि. हर्षवर्धन गवळी यांची नगर, पो.नि. उमाकांत कस्तुरे यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे. तसेच सपोनि गोरक्ष पालवे यांची बीड, सपोनि मंजुषा सानप यांची जालना, मुस्तफा शेख ( बेंबळी ) यांची बीड, सपोनि गोविंद कोल्हे ( तुळजापूर ) यांची औरंगाबाद, सपोनि हरिभाऊ खाडे ( उमरगा ) यांची जालना, सपोनि किशोर चोरगे ( वाशी ) यांची बीड, सपोनि मग्न राठोड ( परंडा) यांची औरंगाबाद येथे बदली करण्यात आली आहे.
आणखी कुणाकुणाच्या बदल्या झाल्या ते आमच्या उस्मानाबाद लाइव्ह फेसबुकवर पाहा
उस्मानाबाद जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या https://www.osmanabadtoday.com
Posted by Osmanabad Live on Sunday, November 1, 2020
COMMENTS