उस्मानाबाद - उस्मानाबाद (श.) पो.ठा. हद्दीतील एका 15 वर्षीय मुलीचे गल्लीतीलच एका युवकाने (नाव- गाव गोपनीय) दि. 22.11.2020 रोजी 10.30 वा. स...
उस्मानाबाद - उस्मानाबाद (श.) पो.ठा. हद्दीतील एका 15 वर्षीय मुलीचे गल्लीतीलच एका युवकाने (नाव- गाव गोपनीय) दि. 22.11.2020 रोजी 10.30 वा. सु. राहत्या गल्लीतून अज्ञात कारणासाठी अपहरण केले. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या आईच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुममध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
मरुम: मुरुम पो.ठा. हद्दीतील एका खेडेगावातील एका युवक (नाव- गाव गोपनीय) गावातीलच 12 वर्षीय मुलास दुध आणण्यासाठी मोटारसायकलवर सोबत घेउन गेला होता. दरम्यान त्या मुलाला गावाबाहेरील एका शेतात त्या मुलासोबत त्या युवकाने अनैसर्गीक लैंगीक अत्याचार केले. अशा मजकुराच्या पिडीत मुलाच्या आईने काल दि. 22.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 377 आणि पोक्सो कासदा कलम- 4, 8, 12 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
उमरगा: औराद, ता. उमरगा येथील मोहन तुकाराम कांबळे यांचे कुटुंबीय व उध्दव माधव वाघमारे यांच्या कुटूंबीयांत दि. 20 व 21.11.2020 रोजी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन वाद होउन दोन्ही गटांनी परस्पर गटातील स्त्री- पुरुषांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, पट्ट्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही गटांनी दि. 22.11.2020 रोजी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत.
परंडा: जयदेव आबा गोफणे, रा. कौडगाव, ता. परंडा यांच्या शेतातील दगड शेजारच्या- हजारे कुटूंबीयांनी स्वत:च्या शेतात टाकण्यास नेले होते. याचा जाब जयदेव गोफणे यांनी विचारला असता दि. 21.11.2020 रोजी 17.30 वा. सु. हजारे कुटूंबातील बळीराम, विजय, अजय, कावेरा, वैजिनाथ, गणेश, भैरवनाथ, राहुल यांनी जयदेव यांसह पुतण्या- विकास व बाजीराव यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या जयदेव गोफणे यांनी काल दि. 22.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 147, 148, 149 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS