उस्मानाबाद - नितीन गायकवाड रा.कौडगाव ता.बार्शी यांनी एम . आय.डी.सी.कौडगांव येथे बांधकाम साहीत्य ठेवले होते . त्यातील लोखंडाचे ०८ रॉड अज्ञ...
उस्मानाबाद - नितीन गायकवाड रा.कौडगाव ता.बार्शी यांनी एम . आय.डी.सी.कौडगांव येथे बांधकाम साहीत्य ठेवले होते . त्यातील लोखंडाचे ०८ रॉड अज्ञात चोरटयाने दि .२१ / ११ / २०२० रोजी पहाटे चोरून नेले आहेत . अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरून दि .२ ९ / ११ / २०२० रोजी भा.दं.सं.कलम ३७ ९ नुसार गुन्हा नोंदवला आहे .
येरमाळा- अमरजीत हलकरे रा.तेरखेडा ता.वाशी यांनी आपली यामाहा कंपनीची मोटार सायकल कं.एम.एच .०५ बी.एक्स .८४०५ ही दि .२ ९ / ११ / २०२० रोजी पहाटे ०५.०० वाजता तेरखेडा बस थांबा परीसरात लावली होती . ती दुपारी १२.३० वाजता लावल्याजागी आढळली नाही . यावरून अज्ञात चोरटयाने ती चोरून नेली आहे . अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरून दि .२ ९ / ११ / २०२० रोजी भा.दं.सं.कलम ३७ ९ नुसार गुन्हा नोंदवला आहे .
शिराढोण- शिराढोण - आवाड शिरपुरा रस्त्यावर असणा - या मांजरा ॲग्यो प्रोड्युसर कंपनीच्या पत्रा शेडचे शटर दि .२८ / ११ / २०२० रोजी पहाटे अज्ञात चोरटयाने उचकटुन आतील १.५ मेट्रीक टन सोयाबीन कंपनीतील पोत्यांमध्ये भरून चोरून नेले . अशा मजकुराच्या पद्माकर पाटील रा.शिराढोण ता.कळंब यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून दि .३० / ११ / २०२० रोजी भा.दं.सं.कलम ४६१ , ३८० नुसार गुन्हा नोंदवला आहे .
तुळजापुर- श्री.तुळजा भवानी मंदीर प्रवेशाचे मोफत पास नोंदणी व वितरण तुळजापुर येथील साप्ताहीक बाजार मैदान परीसरातील १२४ भक्त निवास येथे केले जात आहे . दि .२९ / ११ / २०२० रोजी ०१.३० वाजता तुळजापर येथील संदीप टोले व लखन भोसले हे तेथे पास काढण्यास आले . यावेळी त्यांच्या पासवरील छायाचित्रे ही खराब आल्याच्या कारणावरून त्यांनी पास वितरण करणा - या बीव्हीजी कंपनीचे कर्मचारी निलेश झालटे व सुरक्षा रक्षक भुजंग महाडीक यांना शिवीगाळ करून मारहाण केली . तसेच तेथील संगणकाच्या प्रिंटरची मोडतोड करून संगणकाचा कॅमेरा घेऊन पळुन गेले . अशा मजकुराच्या सुरक्षा रक्षक भुजंग महाडीक यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरून दि . ३०/११/२०२० रोजी भा.दं.सं.कलम ३९४,४२७,५०४,५०६ नुसार गुन्हा नोंदवला आहे .
COMMENTS