उस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांन...
उस्मानाबाद - आनंदनगर पो.ठा. अकस्मात मृत्यु क्र. 37 / 2020 सीआरपीसी कलम 174 च्या चौकशीत स्वरुपा संजय पोतदार, रा. समता कॉलनी, उस्मानाबाद यांनी लेखी निवेदन दिले की, त्यांचे पती- संजय पोतदार हे अजय गायकवाड, रा. उस्मानाबाद यांच्यासह दि. 07.10.2020 रोजी 17.30 वा. सु. उस्मानाबाद शहरातील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 4754 ने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान अजय गायकवाड यांनी नमूद मो.सा. निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने ती रस्त्या बाजूस असलेल्या झाडास धडकली. या अपघातात पाठीमागे बसलेले संजय पोतदार हे गंभीर जखमी होउन मयत झाले. यावरुन अजय गायकवाड यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अन्वये दि. 25.11.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद - संजय चतुर्भुज लाड, रा. उस्मानाबाद व त्यांचा मुलगा- शौर्य असे दोघे दि. 24.11.2020 रोजी 20.38 वा. सु. उस्मानाबाद शहरातील विश्व ट्रॅव्हल्स कार्यालयासमोरील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 25 एजी 6727 ने प्रवास करत होते. यावेळी कार क्र. एम.एच. 12 एचएल 9151 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे, हयगईने चालवून संजय लाड यांच्या मो.सा. ला धडक दिल्याने संजय लाड व शौर्य हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संबंधीत कार चालक घटनास्थळावरुन कारसह पसार झाला. अशा मजकुराच्या संजय लाड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 427 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
चोरीचे दोन गुन्हे दाखल
उस्मानाबाद (श.): सुमित शिवशंकर शेट्टे, रा. ओमनगर, शेकापूर रोड, उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 25.11.2020 रोजी 11.00 ते 17.55 वा. चे दरम्यान तोडून घरातील 100 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सुमित शेट्टे यांनी दि. 25.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर: लक्ष्मीबाई विश्वंभर कांबळे, रा. माकणी, ता. लोहारा या दि. 23.11.2020 रोजी 13.30 वा. सु. नवीन बसस्थानक, तुळजापूर येथे बसमध्ये चढत असतांना त्यांच्या गळ्यातील 7 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र गर्दीचा फायदा घेउन अज्ञात चोरट्याने हिसकावून नेले. अशा मजकुराच्या लक्ष्मीबाई कांबळे यांनी आज दि. 26.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
COMMENTS